Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड... सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवला

लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागानं ४१०.३० कोटी रूपये निधीला मंजुरी दिली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana File Photo
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana Suptember Instalment :

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं खुशखबर दिली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी वित्त विभागानं ४१० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागानं ४१०.३० कोटी रूपये निधीला मंजुरी दिली आहे. यासाठी वित्त विभागानं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला आहे.

Ladki Bahin Yojana
Coldrif Cough Syrup Row : विषारी कफ सिरप प्रकरणी स्रेसन फार्मासिटीकल्सच्या मालकाला अटक

अनुसूचित जाती घटकांकरिता असणारा हा निधी वित्त विभागानं लाडकी बहीण योजणेसाठी वळवला आहे. याबाबत राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला.

याबाबत माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या, सणासुदीच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना तो हप्ता देण्यात यावा असा आमचा प्रयत्न असतो. विभाग म्हणून आम्ही याबाबतची प्रक्रिया मान्यतेसाठी दिली आहे. सणासुदीच्या कालावधीत निधी प्राप्त व्हावा ही आमची अपेक्षा असते. ज्यावेळी निधी मिळेल त्या क्षणी तो वितरित करण्यात येईल.'

Ladki Bahin Yojana
Gold Price Diwali: दिवाळीत सोन्याचा दर जाणार दीड लाखांवर,कारण काय?

तटकरे पुढे म्हणाल्या, 'सध्याच्या परिस्थितीत जिथं नुकसानग्रस्त भाग आहे तिथं अधिकाधिक नुकसान भरपाई देणं याकडं शाससानाचं प्राधान्य आहे. ज्या क्षणी लाडक्या बहिणीचा हप्ता किंवा त्याची मंजूरी ज्या क्षणाला आम्हाला येईल तशी ती लवकरात लवकर वितरित करू. सणासुदीच्या काळात लवकर मंजूरी आली तर चांगलंच आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news