Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता जमा; तुमच्या खात्यात पैसे आले का? 'या' सोप्या पद्धतीने तपासा!

महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही, कसं तपासायचं?
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanafile photo
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana

मुंबई: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या महिला लाभार्थींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही, कसं तपासायचं?

'लाडकी बहीण' योजना महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ पासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याप्रमाणे या वेळीही १,५०० रुपये थेट जमा केले जाणार आहेत. सध्या या योजनेच्या लाखो महिला लाभार्थी आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojana
Foreign travel woman alimony case : परदेश दौरे करणाऱ्या महिलेला वाढीव पोटगी नाही

पैसे खात्यात जमा झाले का? कसं तपासायचं!

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचे पैसे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जातात. आपले पैसे जमा झाले आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा वापर करा:

  • कस्टमर केअरला कॉल करा: आपल्या संबंधित बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करून खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती तुम्ही मिळवू शकता.

  • ऑनलाईन बँकिंग किंवा ॲपचा वापर: ज्या महिला ऑनलाईन बँकिंग सुविधा किंवा बँकेचे अधिकृत ॲप वापरतात, त्या बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून किंवा ॲपमध्ये तपासणी करून पैसे जमा झाले आहेत का, हे पाहू शकतात.

  • मोबाईलवर आलेला मेसेज तपासा: बँक खात्यात पैसे जमा झाल्यावर लाभार्थींच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसा मेसेज येतो. हा महत्त्वाचा मेसेज आला आहे की नाही, हे तपासा.

  • बँकेला प्रत्यक्ष भेट द्या: जे लाभार्थी ऑनलाईन बँकिंग वापरत नाहीत, त्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.

18 नोव्हेंबरच्या आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करा

मंत्री आदिती तटकरे यांनी पात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. "योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी," असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news