सरकारने शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा : फडणवीस

Ladki Bahin Yojana |''सरकारने शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा''
Devendra Fadnavis - Ladki Bahin Yojana
सरकारने शब्द पाळला, लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत-फडणवीसfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देत लाडकी बहिण योजनेबद्दल सांगितले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, बहिणींसाठी भावाचे कर्तव्य म्हणून आम्ही ही योजना आणली. ७ तारखेपासून बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. सरकारने शब्द पाळला आहे. १७ ऑगस्ट पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. ही रक्षाबंधनाची ओवाळणी द्यायला आम्हीला संधी मिळाली, त्यासाठी आम्ही भाग्यशाली समजतो.

यावेळी फडणवीस म्हणाले, आमचा भारत देश असाच विकसित होत राहो आमचा तिरंगा झेंडा सातत्याने फडकत राहो, लोकशाही प्रगल्भ होत राहो, अशी शुभेच्छा देतो.

लाडकी बहिण योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले- मला आनंद आहे की, लाडकी बहिण योजना जी आम्ही घोषित केली होती, त्याचा निधी कालपासून वितरीत करायला सुरुवात केली आहे. १७ तारखेपर्यंत १ कोटीपेक्षा जास्त लाडक्या भगिनींच्या खात्यात पैसे जमा होतील. नंतर जे फॉर्म भरत आहेत, त्यांची प्रोसेस झाल्यानंतर त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही निधी जम करू. पण मला अतिशय आनंद आहे की, रक्षाबंधनाची ओवाळणी द्यायला मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news