

Ladki Bahin Yojana e-KYC update
मुंबई : लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हजारो लाडक्या बहिणींना १५०० रूपयांचा हफ्ता मिळालेला नाही. अशा अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना आता पुन्हा ‘ई-केवायसी’मध्ये दुरुस्ती करता येणार आहे.
ई-केवायसीतील चुकीच्या माहितीमुळे ज्या लाभार्थी महिलांना पैसे मिळत नाहीत त्यांच्याकडून पुन्हा अर्ज मागवण्यात आले आहेत. आज (दि. २७) पासून ३१ जानेवारीपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे त्यांचा अर्ज आणि इतर कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.
ई-केवायसी करताना कॉलम चुकीचा भरल्यामुळे लाभ थांबल्याची माहिती समोर आली होती. आता ज्या महिलांचे पुन्हा अर्ज प्राप्त होतील त्याचे प्रशासनाकडून क्रॉस व्हेरिफिकेशन करून चुका दुरुस्त केल्या जाणार आहेत. चुका दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आहे, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.
२७ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत ई-केवायसी करताना चूक झालेल्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा.
लाडक्या बहिणींनी यासाठी एक अर्ज करावा लागणार आहे.
त्यासोबत आधार कार्ड झेरॉक्स आणि स्वयंघोषणापत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागेल.