

मुंबई: राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाला ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा होतील आणि त्यांची दिवाळी आणखी गोड होईल.
राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पैसे थेट खात्यात जमा केले जात आहेत.
लाडक्या बहिणींची काही महिन्यांची रक्कम थकली असून, ही रक्कम दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात टाकून त्यांची दिवाळी गोड करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी ३४४ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागातून वर्ग करण्यात आला आहे.