

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) अर्ज यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी केंद्रात हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यासंदर्भातील जीआर राज्य शासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे.
याआधी बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्षप्रमुख, आशा स्वयंसेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येत होते. आता अंगणवाडी सेविकांशिवाय इतर कुणालाही या योजनेचे अर्ज भरून घेता येणार नाहीत, असे या जीआरमध्ये म्हटले आहे. (Ladki Bahin Yojana)