Kurla Tree Collapse : मुंबईत धोकादायक झाडाचा तिसरा बळी, कुर्ला येथे झाड कोसळून दुकानदाराचा मृत्यू

मुंबई पालिकेच्या कारभाराविरोधात स्थानिकांचा तीव्र संताप, ठिय्‍या आंदोलन
Kurla Tree Collapse
Kurla Tree Collapse : कुर्ला येथील नौपाडा शाळेजवळ आज झाड कोसळून दुकानदार युनूस हकीमुद्दीन शेख यांचा मृत्यू झाला.Pudhari
Published on
Updated on

Kurla tree collapse : कुर्ला येथील नौपाडा शाळेजवळ आज (दि. ५ जुलै) झाड कोसळून दुकानदार युनूस हकीमुद्दीन शेख यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या एका आठवड्यात कुर्ला परिसरात झाड कोसळून मृत्‍यू होण्याची ही तिसरी घटना असल्याने महापालिका प्रशासनाविरोधात घटनास्‍थळी स्‍थानिकांनी ठिय्‍या आंदोनल केले.

नव्या दुकानाच्या स्वागताऐवजी काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, मृत युनूस शेख यांनी कुर्ला परिसरात नुकतेच एक नवीन दुकान खरेदी केले होते. या दुकानाचा उद्धाटन सोहळा कसा करायचा, त्याचे नियोजन करण्यासाठी आणि तयारी पाहण्यासाठी ते आज अत्यंत आनंदाने आपल्या दुकानात आले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ते दुकानात असतानाच अचानक त्यांच्या अंगावर झाड कोसळले आणि या अपघातात त्यांचा नाहक जीव गेला. त्यांच्या या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Kurla Tree Collapse
Sindhudurg storm news: मध्यरात्री निसर्गाचा कहर; चौकुळच्या म्हार्टवाडी-बेरडकीवर वादळाचा घाला

घटनास्थळी पालिकेची कमालीची अनास्था

या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाचा अत्यंत संवेदनशील आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ही भीषण घटना घडून तब्बल दोन तास उलटून गेले, तरी मुंबई महानगरपालिकेचा (BMC) एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. पालिकेच्या या कमालीच्या अनास्थेमुळे आणि दिरंगाईमुळे घटनास्थळावरील स्‍थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Kurla Tree Collapse
Mumbai Manhole Accident Video: मुंबईत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

'मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त झालाय का?' स्थानिकांचा संतप्त सवाल

या घटनेमुळे कुर्ला परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचा संताप आणि तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे. एकाच आठवड्यात झाड पडून तब्बल ३ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे."मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त झालेला आहे का?" असा संतप्त आणि आर्त प्रश्न आता स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

Kurla Tree Collapse
Pimpri Chinchwad Tree Fall: पिंपरी-चिंचवडमध्ये धोकादायक झाडांचा धोका; १५ ठिकाणी झाडे कोसळली, महापालिकेवर प्रश्नचिन्ह

धोकादायक झाडांची छाटणी वेळेवर का केली जात नाही?

धोकादायक झाडांची छाटणी वेळेवर का केली जात नाही? आणि दुर्घटना घडल्यानंतरही अधिकारी तात्काळ का पोहोचत नाहीत? अशा शब्दांत पालिकेच्या कारभारावर स्थानिक जनतेने तीव्र आक्षेप घेतला असून, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news