Mumbai SRA Flat Fraud: स्वस्तात एसआरए फ्लॅट देण्याचे आमिष; बहीण-भावाची ७७ लाखांची फसवणूक, दोघे जेरबंद

दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

मुंबई: स्वस्तात एसआरए फ्लॅट देण्याचे गाजर दाखविणार्‍या दोन ठगांना कुरार पोलिसांनी अटक केली. गणेश शिवप्रताप गुप्ता आणि अमीत धोंडू येलवे अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर फ्लॅटच्या नावाने एका बहीण-भावाची सुमारे ७७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार मालाड येथे राहत असून गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्यासह त्यांच्या बहिणीला मालाड येथे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची होती. याच दरम्यान त्यांची गणेश गुप्ताशी ओळख झाली होती.

 Fraud
Mumbai DRI Operation: मुंबईत २ किलो सिंथेटिक ड्रग्ज, ९,२३० ई-सिगारेट जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

त्याच्यासह त्याचा मित्र अमीत येलवे हे एका एसआरए प्रोजेक्टमध्ये कामाला आहे. त्याच्या माऊली साई डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मालाडच्या कुरारगाव, आंबेवाडीतील एसआरए इमारतीच्या प्रोजेक्ट काम असून या इमारतीमध्ये त्यांच्या मालकीचे काही फ्लॅट आहेत. तेच फ्लॅट त्यांना स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले.

याच इमारतीमध्ये दोन फ्लॅट दाखवून त्यांनी त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी तिथे दोन फ्लॅट बुक केले. या फ्लॅटसाठी तक्रारदारासह त्यांच्या बहिणीने गणेश गुप्ता आणि अमीत येवले या दोघांनाही टप्याटप्याने ७७ लाख ६७ हजार ५३४ रुपये दिले. पेमेंटनंतर फेब्रुवारी २०२१ रोजी वांद्रे येथील एका कार्यालयात त्यांच्यात एक करार झाला.

 Fraud
Mumbai Water Supply Update: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; तलावांतील पाणीसाठा ९० टक्क्यांवर

त्यात त्यांना ४०१ आणि ६०१ क्रमाकांच्या फ्लॅटचे वाटप पत्र देण्यात आले. हे पत्र घेऊन दोघेही त्यांच्या फ्लॅटमध्ये गेले असता तिथे दुसरीच व्यक्ती राहत असल्याचे दिसले. विशेष म्हणजे दोन्ही फ्लॅट राहणार्‍यांच्या मालकीचे होते आणि या फ्लॅटशी गणेश गुप्ता व अमीत येलवे यांचा काहीही संबंध नव्हता.

हा प्रकार उघडकीस येताच बहीण-भाऊ पैसे परत मागण्यासाठी गुप्ता- येलवे यांच्याकडे धावले मात्र दोघेही पळून गेले होते. शेवटी बहीण-भावाने कुरार पोलिसांत तक्रार केली. शहानिशा केल्यानंतर गणेश गुप्ता आणि अमीत येलवे यांच्याविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून ७७ लाख ६७ हजार ५३४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news