Satara tourism development: सातारा पर्यटनाला मिळणार जागतिक ओळख: मंत्री शंभूराज देसाई

‘मेघदूत‌’ या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
Satara tourism development
Satara tourism developmentPudhari
Published on
Updated on

मुंबई: कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026 च्या माध्यमातून साताऱ्याच्या पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देऊ, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. ‌‘मेघदूत‌’ या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

देसाई म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर केंद्रस्थानी आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

Satara tourism development
Medical Funding: वैद्यकीय क्षेत्रासाठी ‌‘जायका‌’चे सहकार्य; 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंजुरी: मुख्यमंत्री

त्यापैकी कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026 हा एक आहे. महाबळेश्वर तापोळा मुनावळे गाडवली या परिसरात येत्या डिसेंबरमध्ये जागतिक दर्जाच्या स्वरूपात हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

महोत्सवामध्ये टेंट सिटी, विविध जलक्रीडा, हेलिकॉप्टर राईड, ड्रोन व लेझर शो, फ्लोटिंग मार्केट, विद्युत रोषणाई, पारंपरिक खाद्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, बगी राईड, कर्निवल परेड, महिला बचत गट स्टॉल, बाल मेळ्यात फन ट्रेन, आकर्षक विद्युत रोषणाई, किल्ले व शस्त्र प्रदर्शन, टेंपल हेरिटेज राईड, योगा सत्रे तसेच घोडेस्वारी यांसारखे विविध उपक्रम असतील.

Satara tourism development
Maharashtra SIR campaign: महाराष्ट्रातही भाजपचा ‌‘एसआयआर‌’

या उपक्रमामुळे पर्यटकांना आकर्षित करताना स्थानिक महिला तसेच युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून साताऱ्यात उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमुळे या महोत्सवाला विशेष गती मिळणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक नवा मानदंड प्रस्थापित करेल, असा दावाही देसाई यांनी केला.

या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक सुशिल पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news