Medical Funding: वैद्यकीय क्षेत्रासाठी ‌‘जायका‌’चे सहकार्य; 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंजुरी: मुख्यमंत्री

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत समन्वयाने काम करणार आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे. जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी आसाम आणि तामिळनाडू आणि आता महाराष्ट्रातही ‌‘मेडिकल केअर सिस्टम‌’ मजबूत करण्यासाठी जायका पुढाकार घेत आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत समन्वयाने काम करणार आहे.

Devendra Fadanvis
Maharashtra SIR campaign: महाराष्ट्रातही भाजपचा ‌‘एसआयआर‌’

या प्रस्तावित भागीदारीत, सध्याच्या शासकीय वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक निदान (डायग्नोस्टिक) यंत्रणा अधिक सक्षम करणे विशिष्ट आजारांसाठी ‌‘सेंटर ऑफ एक्सलन्स‌’ उभारणे, नवीन नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालयांची स्थापना करून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, आरोग्य व्यवस्थापन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सहाय्य आदी कामे केली जाणार आहेत.

या वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीकडून 3 हजार 708 कोटींचे वित्तीय सहाय्य उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Devendra Fadanvis
Jaitapur nuclear project: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जैतापूर प्रकल्पासाठी करार: मुख्यमंत्री

या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक होईल. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. एकूणच, जायका आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील ही प्रस्तावित भागीदारी आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news