Konkan Railway Jobs: कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी भरती; 8 जूनपासून वॉक इन मुलाखती

रेल्वेच्या www.konkanrailway.com या वेबसाईटवर अधिसूचना पाहून त्यानुसार अर्ज करावा
Konkan Railway Jobs
Konkan Railway JobsPudhari
Published on
Updated on

मुंबई: कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी करार तत्वावर कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. यासाठी 8 जूनपासून वॉक इन मुलाखती होणार असून या मुलाखती विविध पदांसाठी 30 जूनपर्यंत चालणार आहेत.

उमेदवारांनी अधिसूचना, पात्रता निकष आदी तपशीलांसाठी कोकण रेल्वेच्या www.konkanrailway.com या वेबसाईटवर अधिसूचना पाहून त्यानुसार अर्ज करावा, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Konkan Railway Jobs
Dharavi Bus Depot Redevelopment: धारावी, काळा किल्ला बेस्ट डेपो जमीन पुनर्वसनात!

कोकण रेल्वेमध्ये 17 विविध पदांसाठी 150 जागा भरण्यात येणार आहेत. करार तत्त्वावर ही भरती करण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पदांसाठी ओबीसी, एससी, एसटी व अन्य आरक्षण असणार आहे.

या पदांमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक व यांत्रिकी, गुणवत्ता निरीक्षक, तंत्रज्ञ (वेल्डर), तंत्रज्ञ (ऑपरेटर), तंत्रज्ञ (फिटर), वाहन चालक, लिस्ट ऑपरेटर आदी पदांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Konkan Railway Jobs
Mumbai APMC Market: मुंबई एपीएमसी पहिला राष्ट्रीय बाजार

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक व यांत्रिकी -8 जून

गुणवत्ता निरीक्षक - 8 जून

तंत्रज्ञ (वेल्डर) - 9 जून

तंत्रज्ञ (ऑपरेटर) - 9 जून

तंत्रज्ञ (फिटर) - 10 जून

वाहन चालक - 10 जून

लिस्ट ऑपरेटर - 11 जून

हायड्रो ऑपरेटर - 11 जून

ऑफिस बॉय ( हेल्पर खलाशी) - 12 जून

सहाय्यक वित्तीय सल्लागार - 29 जून

सहाय्यक साहित्य व्यवस्थापक - 29 जून

विभाग अधिकारी - 29 जून

डेपो साहित्य अधीक्षक - 30 जून

कर्मिक निरीक्षक - 30 जून

सहाय्यक लेखा अधिकारी - 17 जून

विभाग अधिकारी - 18 जून

लेखा सहाय्यक - 19 जून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news