Konkan Hapus mango: कोकण हापूसची पहिली पेटी मुंबईत दाखल; सहा डझन पेटीला ३५ ते ३८ हजारांचा भाव

देवगडमधील बागायतदार निलेश बांदकर यांचा नवा प्रयोग; यंदा ३० ऑक्टोबरलाच हापूसचे आगमन
Konkan Hapus mango
Konkan Hapus mangoPudhari
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: मुंबई एपीएमसीतील घाऊक फळ बाजारात कोकण हापूसची पहिली पेटी शुक्रवारी मे. जनार्दन ॲण्ड कंपनी बापू भुजबळ या व्यापाऱ्यांकडे दाखल झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निलेश वसंत बांदकर विजयदुर्ग ( रामेश्वर) यांनी ही ६ डझन पेटी पाठवली असून ३५ ते ३८ हजार दर या पहिल्या पेटीला मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांनी पुढारीला सांगितले.

दिवाळीच्या पाडव्याला आणखी सहा ते सात पेट्या पाठवणार असल्याचा निरोपही निलेश बांदकर यांनी पाठवला आहे. कोकण हापूसच्या एक ते दोन पेट्या डिसेंबर अखेरीस मुंबईत येण्याचा शिरस्ता गेल्या चार ते पाच वर्षांपासून आहे. त्यानंतर जानेवारीत २५ ते ३० पेट्यांची आवक होते.

Konkan Hapus mango
Maharashtra BJP: विधान परिषद निवडणुकीतील पराभवावर भाजप हायकमांड नाराज; पुणे आणि नागपूरच्या निकालांचा अहवाल मागवला

१५ फेब्रुवारीपासून ही आवक वाढते आणि ५० ते १०० पेट्यांपर्यंत पोहोचते. मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुबलक हापूस मुंबई एपीएमसीत उपलब्ध होतो. शेवटच्या तीन महिन्यांत तर ५० हजार ते १ लाख पेट्यांची रोजची आवक कोकणातून होते.

Konkan Hapus mango
Vimal Elaichi Ad Actors: विमल इलायची जाहिरात प्रकरणी तिन्ही अभिनेते दोषी

यंदा मात्र हापुसच्या आगमनाने ३० ऑक्टोबरचाच मुहूर्त गाठला. देवगडच्या गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार निलेश बांदकर यांनी पहिली पेटी हंगामापूर्वीच मुंबईकडे रवाना केली. ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याचे उत्पादन घेत त्‍यांनी नवा प्रयोग यशस्वी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.