Maharashtra BJP: विधान परिषद निवडणुकीतील पराभवावर भाजप हायकमांड नाराज; पुणे आणि नागपूरच्या निकालांचा अहवाल मागवला

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली; महायुतीतील समन्वयाच्या अभावावरूनही आरोप-प्रत्यारोप
BJP
BJPPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पाच जागांच्या निवडणुकीतील कामगिरीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवाची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा ३,२७१ मतांनी पराभव केला. या निकालामागे भाजपमधील अंतर्गत नाराजी कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

BJP
Vimal Elaichi Ad Actors: विमल इलायची जाहिरात प्रकरणी तिन्ही अभिनेते दोषी

निवडणुकीत तब्बल १५ हजारांहून अधिक मते बाद झाली, ज्यामध्ये सुमारे ४ हजार मतपत्रिकांवर पहिल्या पसंतीऐवजी दुसऱ्या पसंतीचा क्रमांक मुद्दाम टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी घेतलेल्या २५ हजार मतांपैकी दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते काँग्रेसकडे गेल्याने भाजपला फटका बसला.

महायुतीतील समन्वयाचा अभाव

पाच जागांपैकी महाविकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळवला, तर सत्ताधारी महायुतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. पुणे पदवीधर आणि अन्य काही मतदारसंघांत शिवसेनेने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

BJP
Cyber Crime Mumbai | शायना एन.सी. यांच्या पाठपुराव्याला यश; सायबर भामट्यांकडून फसवलेले ३.१५ लाख मिळविले परत

दुसरीकडे, शिवसेनेने हे आरोप फेटाळत महायुतीमध्ये योग्य समन्वयाचा अभाव असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत सर्व त्रुटींचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.