अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या किक बॉक्सिंग शिक्षकाला अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या किक बॉक्सिंग शिक्षकाला अटक
Mumbai news
अश्‍लील चाळे करुन बारा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार माझगाव परिसरात उघडकीस आला.file photo

मुंबई : अश्‍लील चाळे करुन बारा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार माझगाव परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साहिल बपेरकर या किक बॉक्सिंग क्लासच्या शिक्षकाला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यांत त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत मुलगी ही बारा वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियांसोबत माझगाव परिसरात राहते. याच परिसरातील एका किक बॉक्सिंग क्लाससाठी ती जात होती. तिथे आरोपी साहिल हा शिक्षक म्हणून काम करत होता. फेब्रुवारी ते जून या कालावधीत त्याने तिच्याशी अनेकदा जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्‍लील चाळे करुन विनयभंग केला होता.

Mumbai news
कोल्‍हापूरचे बनले 'मिर्झापूर'..! तीन महिन्‍यात 'ओटीटी' स्‍टाईल तीन मर्डर...

सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र त्याच्याकडून सतत तिचा विनयभंग आणि लैगिंक चाळे होण्याचे प्रकार सुरु होते. त्यामुळे तिने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर तिने भायखळा पोलिसांत साहिलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच साहिलला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news