Crime News: खालापुरात वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या; नातेवाइकांचा आक्रोश

पोलिसांकडून तपास सुरु
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

प्रशांत गोपाळे

खोपोली: खालापूर तालुक्यातील निगडोली गावात घरात 75 वर्षीय वृद्ध दाम्पत्याची गळा कापून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच तालुका हदरला असून नातेवाईकांच्या आक्रोशाने हळहळ व्यक्त होत आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी आणि नेमकी कधी झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

घटनास्थळी खालापूर पोलिस, अन्य तपास यंत्रणा तत्काळ पोहोतल्या असून कसून तपास करीत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेतून सेवानिवृत्त झालेले रघुनाथ दत्तू फराट (वय 75) आणि त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फराट ( वय -72 ) हे दोघेच निगडोली येथे राहत होते.

त्यांची मुले खोपोली व खालापूर मध्ये वास्तव्यात आहेत. मंगळवारी 26 मे रोजी रघुनाथ फराट यांच्या मुलाने वडिलांचा मोबाईल दिवसभर लागत नसल्याने बंद का आहे, त्यांचा फोन लागत का नाही, मनात शंका आली.

Crime News
Mumbai News: कमी पटसंख्येच्या जिल्ह्यांतील आदर्श महाविद्यालयांना नवसंजीवनी

भितीपोटी त्यांनी नातू आदित्य फराट याला गावातील घरी पाठवले. नातू आदित्यने घराचा दरवाजा वाजविला असतानाही ते उघडत नसल्यामुळे आदित्याने मागच्या दरवाज्यातून घरात प्रवेश केला. यावेळी आजी आजोबा रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे पाहून त्यांच्या पाया खालील जमीनच सरकली.

रघुनाथ दत्तू फराट यांचा गळा कापला होता तर त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फटाट यांच्या तोंडावर वार केले आणि अंगावर राख आणि पाळापाचोळा टाकलेला दिसून आल्यावर नातू आदित्यने आराडाओरडा केला. यावेळी गावातील गावकरी जमा झाले.घटनास्थळी खालापूर पोलिस पोहचून तपास सुरू केला आहे.फॉरेन्सी लॅबची टीम घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे.

Crime News
Mumbai MD lab case: आग्रीपाड्यात फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्जची प्रयोगशाळा; महिलेसह तिघांना अटक

खालापूर हादरले

अज्ञात हल्लेखोरांनी वयोवृद्ध दाम्पत्यांची हत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण खालापूर हादरले असून या हत्यांचे कारण मात्र समजू शकलेले नाही तर ही हत्या कधी घडली याबाबत तर्कवितर्क काढले जात आहे. दरम्यान विशेष पोलीस तपास पथकाने अज्ञात खून्यांचा शोध सुरु केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news