saffron price hike : केशरला आला सोन्यापेक्षा अधिक भाव

काश्मीरचे मोगरा केशर पोहोचले 2,10,000 रुपये किलोवर
saffron price hike
saffron price hikepudhari photo
Published on
Updated on

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

सोन्याचा दर प्रतितोळे 1 लाख 54 हजार रुपये, तर चांदी 2 लाख 30 हजार रुपये किलोवर पोहोचले असतानाच आता काश्मिरी मोगरा जातीच्या केशरनेही बाजारात तेजी घेतली आहे. काश्मिरी मोगरा केशर तब्बल 2 लाख 10 हजार रुपये किलोवर पोहोचले आहे. मुंबई एपीएमसीत गेल्या एप्रिलमध्ये काश्मिरी मोगरा जातीच्या केशरचे दर 1 लाख 60 हजार रुपये किलो होते.

औषधी गुणधर्म असलेले केशर खाद्यपदार्थांतही वापरले जाते. मुंबईसह उपनगरांत केशरला अधिक मागणी आहे. केशर हे मूळ काश्मीरचे उत्पादन असून तेथून देशभरात विक्री केले जाते. वर्षातून केवळ तीन महिने केशरचे उत्पादन निघते. ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत घेतले जाते. तेच उत्पादन वर्षभर बाजारात विकले जाते.

saffron price hike
Hapus mango sales Mumbai : गुढीपाडव्याला मुंबईकरांनी फस्त केले 32 कोटींचेे हापूस

काश्मीर केशर तीन ग्रेडमध्ये बाजारात येते. पहिली ग्रेड काश्मीर मोगरा, दुसरी ग्रेड काश्मीर लच्या, तिसरी ग्रेड काश्मीर किसवाड आणि चुरा अशी आहे. त्या ग्रेडनुसार केशरचे दर निश्चित केले जातात.

मुंबईत सर्वाधिक मोगरा आणि किसवाड केशरला मागणी आहे. मुंबईसह नवी मुंबईत केशरचे सुमारे 150 घाऊक व्यापारी आहेत. केशरची उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. केशरचे दर वाढले तरी ग्राहकांची संख्या आणि मागणी मात्र तेवढीच आहे. प्रत्येक व्यापारी मागणीनुसार केशर मागवत असतो. त्यामुळे आवक सांगणे अवघड असल्याचे केशरचे घाऊक व्यापारी अर्जुनभाई यांनी स्पष्ट केले.

saffron price hike
उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती गगनाला !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news