

मुंबई : Railway Block | कर्नाक पुलाच्या दुसऱ्या स्पॅनच्या कामासाठी आज बुधवार, २९ जानेवारी रोजी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. सीएसएमटी स्थानकातून रात्री १२ वाजून १२ मिनिटांनी शेवटची कर्जत आणि रात्री १२ वाजून १३ मिनिटांनी शेवटची पनवेल लोकल धावणार आहे.
रात्री १२.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यान ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची सर्व लोकल वाहतूक बंद असणार आहे. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल कुर्ला, परळ, दादर आणि भायखळा स्थानकांतून सुटणार आहे. तसेच हार्बरची वाहतूक वडाळा स्थानकापर्यंतच सुरु राहील.
मुख्य मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल सीएसएमटी-कर्जत रात्री १२.१२ वाजता
मुख्य मार्गावर ब्लॉकनंतरच्या पहिली लोकल सीएसएमटी-कर्जत पहाटे ४.४७ वाजता
हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल सीएसएमटी-पनवेल रात्री १२.१३ वाजता
हार्बर मार्गावर ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी-पनवेल पहाटे ४.५२ वाजता