

Fake Note Arrest Kandivali
कांदिवली : गुप्त बातमीरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मालवणी पोलिसांनी गुरुवारी एका कारची झाडझडती घेतली असता भारतीय चलनाच्या बनावटी नोटा, प्रिंटर, लॅपटॉप, इंक, पेपर, कटर व इतर साहित्यासह दोघाना अटक केली आहे. अंदाजे 23 लाख 30 हजारोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संपत सामवय्या एंजपल्ली (46) व रहीमपाशा याकुब शेख (30) यांना अटक केली आहे. दोन्हीही आरोपी तेलंगणा येथील आहेत.
मालाड मालवणी मार्वे बीच, मार्वे रोड, साईबाबा मंदिर येथे निळ्या रंगाची कारमध्ये बनावट नोटा आणि इतर साहित्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे व निगराणी पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. यामध्ये भारतील चलनातील 500 रुपयाच्या 1740 बनावट नोटा तसेच नोटा छापाईसाठी लागणारे साहित्य (लॅपटॉप, प्रिंटर, कलर इंक, कटर, कात्री) जप्त केले आहे.
आरोपींचे मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेली कार, असा अंदाजे 23 लाख 30 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. कलम-178,180,181,182,318 (1), 3 (5) अन्वये गुन्हा नोंद करू दोघांना अटक करण्यात आले. कारवाईत पोलीस हवालदार अनिल पाटील, जगदिश घोसाळकर, पोलीस शिपाई सुंशात पाटील, सचिन वळतकर, मुददसिर देसाई, समित सोरटे,कालीदास खुडे सहभागी झाले होते.
* अटक आरोपी तामीळनाडूचे रहिवासी आहेत.
* बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य त्यांच्याकडून जप्त केले आहे.
* चौकशीत बनावट नाटांचे अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.