Mumbai Crime : कांदिवलीतील एटीएम व्हॅनमधील कॅश चोरीप्रकरणी दोघांना अटक

गुन्ह्यातील कारसह 62 लाख रुपये हस्तगत
Kandivali ATM van cash theft
मुंबई : आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या 63 लाख रुपयांच्या रोख रकमेसह कांदिवली पोलिसांचे पथक. (छाया ः दीपक साळवी)
Published on
Updated on

मुंबई : कांदिवलीतील एटीएम सेंटरमध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यासह गार्डला गुंगारा देऊन सुमारे 63 लाखांची रोख रक्कम एका कर्मचाऱ्याने चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासांत कांदिवली पोलिसांनी आरोपी कर्मचारी सुशांत दीपक कासारे त्याला मदत करणारा सुफियान रज्जबअली याला अटक केली.

या दोघांकडून पोलिसांनी गुन्ह्यातील कारसह 62 लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. अटकेनंतर दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Kandivali ATM van cash theft
India Agriculture Export: आखाती युद्धामुळे शेतीमाल अडकला; 44 भारतीय जहाजे ठप्प

सीएसएम इन्फोसिस्टम लिमिटेड या कंपनीकडे काही बँकेतील एटीएममध्ये कॅश भरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनीचे काही कर्मचारी 21 एप्रिलला रात्री पावणेदहा वाजता कांदिवलीतील एम. जी रोड, राजकिरण सोसायटीमध्ये असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आले होते.

Kandivali ATM van cash theft
Nashik Extortion Case : खंडणी प्रकरणात कैलास मैंद यास जामीन

यावेळी कॅश वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्याने इतर गार्ड आणि कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन कॅश व्हॅनमधील पैशांने भरलेल्या दोन बॅग चोरी करुन पलायन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news