

नाशिक : खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या सावकार कैलास मैंद याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. ७ नोव्हेंबरला उपनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने कैलास मैंद यास ताब्यात घेतले होते. या आधीही त्याच्यावर खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी या स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल होते.
त्या संदर्भात अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी बाकी आहे. त्यामुळे संबंधित गुन्ह्यांमध्ये पोलिसांना त्याचा पुढील ताबा घेणे अपेक्षित आहे. ६ नोव्हेंबरला उपनगर पोलिस ठाण्यात हेमंत कृष्णा कापसे (रा. जेलरोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीने पैशांची अडचण असल्यामुळे ३० जून २०२२ ला ओळखीच्या कैलास मैंद याच्याकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. या व्यवहारात कैलास मैंद याने हमी म्हणून फिर्यादीकडील चारचाकी गाडी तारण ठेवून घेतली होती. यानंतर फिर्यादी यांनी दोन महिन्यानंतर घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्यासाठी गेल्यावर आरोपी कैलास मैंद याने बळजबरीने ५० हजार रुपये घेतले होते. अजून २ लाख ७५ हजार रुपयांची खंडणी मागितली. कैलास मैंद, संतोष कुशारे आणि फरान सय्यद या तिघांनीही फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली होती. कैलास मैंद यास अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.
उपनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
नाशिक : अवैधरीत्या सावकारी करत खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार संशयित कैलास मैंदला उपनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) बेड्या ठोकल्या. त्याच्या दाेन साथीदारांचा शाेध सुरू असून, मैंदविराेधात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पाेलिस शिपाई हेमंत कृष्णा कापसे (४१, भगवा चाैक, अरिंगळे मळा, जेल राेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० जून २०२२ ते नाेव्हेंबर २०२५ या कालावधीत खंडणी मागितल्यासह अवैधरीत्या कर्जवसुली केल्याप्रकरणी उपनगर पाेलिस ठाण्यात संशयित मैंदसह संताेष कुशारे व फरान सय्यद विराेधात गुन्हा नाेंद आहे. जेल राेड येथील शेलार मळ्यातील हरिविहार साेसायटीत मैंदचे कार्यालय असून हेमंत कापसे यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी मैंदकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले हाेते. त्या बदल्यात मैंदने कापसेकडे सव्वादाेन लाख ७५ हजारांची खंडणी मागितली होती. दरम्यान, हे पैसे न दिल्यास कापसेसह कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती, असे कापसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये मैंद गँगने ५० हजार रुपये बळजबरीने घेतल्याचे नमूद आहे. मैंदला न्यायालयाने पाेलिस काेठडी सुनावली आहे.