Best Bus Stop Relocation: एका बिल्डरसाठी जुहू कोळीवाडा बस थांबा स्थलांतराची नोटीस

अचानक नोटिसीमुळे रहिवाशांचा संताप; बेस्टच्या कारवाईची चर्चा
Notice
NoticePudhari
Published on
Updated on

मुंबई: गेल्या पन्नास वर्षांपासून 'जुहू कोळीवाडा' येथे असलेला बेस्ट बस थांबा अचानक दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. स्थानिकांकडून कोणतीही मागणी किंवा तक्रार नसताना अचानक थांबा दुसरीकडे स्थलांतरित करत असल्याची नोटीस सांताक्रूझ आगार व्यवस्थापकांनी येथे फलकावर लावल्याने स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

सांताक्रूझ (पश्चिम) स्थानकाबाहेर जुहू चौपाटी, इस्कॉन श्रीकृष्ण मंदिर तसेच जुहू कोळीवाडा येथे जाण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांपासून जुहूतारा रोड मुख्य रस्त्यावर जुहू कोळीवाडा बेस्ट बस थांबा आहे. या थांब्यावरून सर्वाधिक फेऱ्या असणारी बेस्ट क्र.२३१ तसेच इतर २५५, ७०, ३५५ अशा बस थांबतात.

Notice
Sindhudurg Ghat Roads: सिंधुदुर्गातील घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका कायम

शिवाय कोळीवाडा, मंगलवाडी, जुहूतारा वसाहत येथील ज्येष्ठ नागरिक, शालेय आणि कॉलेज विद्यार्थी, चौपाटीवर फिरायला येणारे पर्यटक यांच्यासाठी हा बेस्ट थांबा खूप सोईचा आहे. त्यामुळे बेस्टला सुद्धा येथील थांब्यावर जास्त महसूल मिळतो.

जवळपास पन्नास वर्षे झाली 'जुहू कोळीवाडा बेस्ट बस थांबा' येथेच आहे. मात्र अचानक २३ जून रोजी हा थांबा दुसरीकडे स्थलांतरित करत असल्याची नोटीस सांताक्रूझ आगार व्यवस्थापकांनी येथे फलकावर लावली आहे. त्यात कोणतेही कारण दिलेले नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये आश्चर्य आणि संताप आहे.

Notice
Drug Crackdown Maharashtra: अमली पदार्थविरोधात चार महिन्यांत बाराशे गुन्हे; २५४ कोटी किमतीचा साठा जप्त

आमच्याकडून कोणतीही तक्रार किंवा सूचना नसताना अचानक हा थांबा बदलला जात आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, शालेय - कॉलेज विद्यार्थी, दिव्यांग प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे आम्ही या विरोधात स्वाक्षरी मोहीम घेत असून विरोधाचे लेखी पत्र सुद्धा बेस्ट प्रशासनाला देत असल्याचे जुहू कोळीवाडा जुहू बझ्झ कम्युनिटी ग्रुपचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news