Inducare Pharma FDA Action: पुण्यातील इंडुकेअर फार्माचे परवाने पुन्हा रद्द; नऊ औषधे अप्रमाणित, दोन औषधांत सक्रिय घटकच गायब

परवानगीशिवाय औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याचे उघड; दोन औषधांत सक्रिय घटकच आढळला नाही
Inducare Pharma FDA Action
Inducare Pharma FDA ActionPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या औषध उत्पादक संस्थेचा उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुन्हा रद्द केला आहे.

आवश्यक उत्पादन परवानगी न घेताच नऊ औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याचे उघड झाले असून, सरकारी विश्लेषकांच्या तपासणीत ही सर्व औषधे अप्रमाणित, चुकीचे लेबल लावलेली किंवा बनावट आढळली आहेत.

त्यामुळे संस्थेचे औषध उत्पादन परवाने पुन्हा रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे, दोन औषधांमध्ये औषधाचा मूळ सक्रिय घटकच आढळला नाही. या औषधांमध्ये हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि पचनसंस्थेच्या आजारांवरील औषधांचाही समावेश आहे. यापूर्वी गेल्या सप्टेंबरमध्येही २५ गंभीर त्रुटी आढळल्या होत्या.

Inducare Pharma FDA Action
Harshwardhan Sapkal: शरद पवार गटाच्या भूमिकेवर काँग्रेस सावध; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘वेट अँड वॉच’

मे. इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या संस्थेला ६ फेब्रुवारी २०२४ रोजी औषध उत्पादनासाठी फॉर्म २५ आणि फॉर्म २८ अंतर्गत परवाने देण्यात आले होते. मात्र, १४ आणि १५ जुलै २०२६ रोजी सहायक आयुक्त आणि औषध निरीक्षकांच्या पथकाने केलेल्या संयुक्त तपासणीत उत्तम उत्पादन पद्धतीशी (जीएमपी) संबंधित तब्बल २५ गंभीर त्रुटी आढळल्या.

त्यानंतर ७ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेचे उत्पादन परवाने रद्द करण्यात आले होते. आता नव्या तपासणीत परवानगीशिवाय औषधनिर्मिती आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांची विक्री केल्याचे उघड झाल्याने प्रशासनाने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे.

नोंदींशिवाय लाखो गोळ्यांचे उत्पादन

तपासणीदरम्यान संस्थेने औषधनिर्मितीच्या आवश्यक नोंदी न ठेवता मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्याचे आढळले. ५५० किलोपेक्षा अधिक मेट्रोनिडाझोल औषधी घटक खरेदी करण्यात आला होता. मात्र, त्याच्या वापराच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. याच घटकाचा वापर करून 'केअरगिल-४००' या औषधाच्या सुमारे १३ लाख ८६ हजार गोळ्या तयार करण्यात आल्या.

विशेष म्हणजे, या उत्पादनासाठी बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड, बॅच पॅकिंग रेकॉर्ड आणि तपासणी अहवाल उपलब्ध नव्हते. यापैकी ५ लाख २० हजार गोळ्यांचे वितरणही करण्यात आले होते. तपासलेल्या नमुन्यात मेट्रोनिडाझोलचे प्रमाण केवळ ३२.४४ टक्के आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.