Jayant Patil: जयंत पाटलांचा मेट्रोने प्रवास; विलासराव देशमुखांच्या काळात मुंबईचे पालकमंत्री असतानाचा सांगितला किस्सा

मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने ग्रँट रोड ते मरोळ नाका असा प्रवास केल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या निर्णय प्रक्रियेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Jayant Patil Mumbai Metro
Jayant Patil Mumbai MetroFile Photo
Published on: 
Updated on: 

Jayant Patil Mumbai Metro

मुंबई : मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनने ग्रँट रोड ते मरोळ नाका असा प्रवास केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या निर्णय प्रक्रियेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईचा पालकमंत्री असताना दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी भूमिगत मेट्रोचा आग्रह धरल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपण मुंबईचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होतो. त्यावेळी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला होता. मात्र, दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक हेरिटेज वास्तूंचे जतन आणि या परिसरातील शासकीय व खासगी कार्यालयांमुळे असलेली वर्दळ लक्षात घेता मेट्रो भूमिगत असावी, अशी आपली आग्रही भूमिका होती, असे पाटील यांनी सांगितले.

पुढे मंत्रिमंडळाने भूमिगत मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज त्याच भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अडथळ्यांविना होत असल्याचे पाहून समाधान वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच शहराचा वारसा जपत शाश्वत विकास साधणे, हीच खरी प्रगती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Jayant Patil Mumbai Metro
Sanjay Raut Delimitation Bill: "हा भाजपचा कट, बाळासाहेब असते तर..." डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊतांचा केंद्रावर गंभीर आरोप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.