Jayant Patil on Ajit Pawar: '३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले...'; अजित पवारांच्या जयंतीनिमित्त जयंत पाटील भावूक

Ajit Pawar birth anniversary: जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने ठसा उमटवणारे अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणी सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Jayant Patil on Ajit Pawar
Jayant Patil on Ajit Pawarfile photo
Published on
Updated on

Jayant Patil on Ajit Pawar birth anniversary

मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने ठसा उमटवणारे राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (दि. २२) पहिली अधिकृत शासकीय जयंती साजरी होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणी सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jayant Patil on Ajit Pawar
Devendra Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसानिमित्त आजपासून राज्यभरात ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’

जयंत पाटील यांनी 'एक्स'वर भावनिक पोस्ट लिहीली आहे. "अजितदादांची आणि माझी मैत्री १९८५ पासून होती. आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. सुख, दुःख, यश, अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या. आमचे अनेक बाबतीत एकमत सुद्धा असे आणि काही बाबतीत वेगवेगळे मत देखील असे; पण चर्चा करून आम्ही एकमतावर यायचो. दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दर वर्षीचा रिवाज या वर्षी मोडला. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील. 'जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन' असे म्हणण्याची इच्छा होत नाही. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा"

अजित पवारांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली

राज्यातील बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनें' तर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २२ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्याचे स्वतः सूतोवाच केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न राहील.

कर्जमाफीच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून आयकर डेटासंदर्भातील माहितीही प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि अजित पवार यांची जयंती, असे औचित्य साधून प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Jayant Patil on Ajit Pawar
Vijay TVK NEET: नीट परीक्षाच रद्द करा; वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण अधिकार राज्यांना द्या, थलपती विजय यांची मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news