ITI Admission : 95 टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या 26 विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल

1 लाख 73 हजार विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
ITI-admission
विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कलPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : दहावीत 95 टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या 26 विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमासाठी अर्ज केले आहेत. तर 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले 567 विद्यार्थी यादीत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात आयटीआयकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून स्पष्ट होते.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने 1 लाख 73 हजार 673 विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश शासकीय व खासगी आयटीआयमधील विविध ट्रेड्समध्ये होणार आहेत. यादीनुसार 80 ते 90 टक्के गुण मिळवलेले 3 हजार 245 विद्यार्थी, तर 70 ते 80 टक्के गुण गटातील विद्यार्थी 51,967 इतके आहेत. 70 टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्यांची संख्या सर्वाधिक असून यामध्येही स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.

ITI-admission
Pune Defense Education | देश-विदेशातील 28 सैनिकांना सागरी अभियांत्रिकीचे प्रशिक्षण

टक्केवारीनुसार अशी आहे विद्यार्थीसंख्या

95 हून अधिक - 26

95 ते 90 - 541

90 ते 85 - 3,245

85 ते 80 - 8,174

80 ते 75 - 13,845

75 ते 70 - 19,234

70 ते 65 - 23,559

65 ते 60 - 25,162

60 ते 55 24,594

55 ते 50 - 21,662

50 ते 45 - 17,110

45 ते 40 - 11,479

40 पेक्षा कमी - 5,042

एकूण विद्यार्थी - 1,73,673

ITI-admission
Education News | अभियांत्रिकी प्रवेशासाठी तीन दिवसांत केवळ 22 हजार अर्ज

आयटीआयकडे आता 95 हून अधिक टक्के गुण मिळवणार्‍यांचाही कल दिसत आहे. पदवी शिक्षणाऐवजी तांत्रिक कौशल्यांवर भर देणारी धोरणे यामुळे गुणवंत विद्यार्थी प्रवेश घेत आहेत . आता प्रवेशाची पहिली यादी 7 जुलै, सायं. 5 वाजता जाहीर होईल, यानंतर प्रत्यक्ष प्रवेश 8 ते 12 जुलै या काळात होणार आहे, यानंतर दुसरी प्रवेश फेरी : 27 ते 22 जुलै या काळात राबवली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news