Stock Market Crash | गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटी गमावले; दोन्ही निर्देशांक गडगडले

अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Stock Market Crash |
Stock Market Crash | गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटी गमावले; दोन्ही निर्देशांक गडगडले
Published on
Updated on

मुंबई : मुंबई शेअर बाजारात बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल दोन लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. अमेरिका आणि इराणमधील युद्धाची तीव्रता वाढल्याने कच्च्या तेलाचे दर पुन्हा शंभर डॉलर्स पार गेले आहेत. अमेरिकेने भारतीय आयटी कंपनीच्या ग्रीन कार्ड अर्जाला स्थगिती दिल्याने आयटी निर्देशांक कोसळला. परिणामी, बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स ८१३ अंकांनी आणि निफ्टी निर्देशांक २०३ अंकांनी गडगडला.

कच्च्या तेलाच्या भावाने शंभर डॉलर्स प्रतिबॅरलपार उसळी घेतल्याने भारताच्या रुपयावरील दबाव वाढला आहे. बुधवारच्या सत्रात एका डॉलरचा भाव ९५.०३ रुपयांवर गेला आहे. सेन्सेक्स ७६४ अंकांवर, तर निफ्टी निर्देशांक २३,४३१ अंकांवर गडगडला. निफ्टीने गत तीन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात प्रत्येकी अर्ध्या टक्क्याहून अधिक घसरण झाली आहे.

ग्रीन व्हिसाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने कॉग्‍निझंट कंपनीच्या ग्रीन कार्ड अर्जांना स्थगिती दिली आहे. तर, अंतर्गत लेखापरीक्षणात त्रुटी आढळल्यानंतर कोफोर्जचे अध्यक्ष ओम प्रकाश भट यांनी राजीनामा दिला. त्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांक तीन टक्क्यांहून अधिक कोसळला. केवळ मेटल निर्देशांकात वाढ झाली.

आयटी निर्देशांकाची पडझड

आयटी निर्देशांकातील विविध कंपन्यांच्या शेअर भावात ५ ते ९ टक्क्यांची घसरण झाली. कोफोर्ज कंपनीचा शेअर भाव सर्वाधिक ८.७ टक्क्यांनी कोसळला. इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि टीसीएस कंपनीचा शेअर भाव प्रत्येकी तीन ते चार टक्क्यांनी खाली आला. तर, एम्फसिस आणि ओएफएसएसचा शेअर भावात दोन ते तीन टक्क्यांची घसरण झाली. चालू कॅलेंडर वर्षात आयटी निर्देशांक २४ टक्क्यांनी कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news