

मुंबई : इंडीगोने नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियम आणि हिवाळी वेळापत्रकाशी संबंधित बदलांसह पाच घटकांच्या संयोजनाला या मोठ्या विस्कळीतपणासाठी जबाबदार धरले आहे. विस्कळीत उड्डाणांमुळे झालेल्या मोठ्या गोंधळाबद्दल दिलगिरी व्यक्त करत, इंडिगो एअरलाइनने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या कारणे दाखवा नोटीसवर आपले उत्तर सादर केले आहे.
नोटीसच्या वेळेत नेमके कारण सांगणेवास्तविक शक्य नाही, असे एअरलाइनने म्हटले आहे. डीजीसीएच्या नियमावलीत 15 दिवसांची मुदत दिली जात असल्याने, त्यांनी सविस्तर मूळ कारण विश्लेषण सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे.
डीजीसीएकडून कठोर कारवाईचे संकेत
नागर विमान वाहतूक मंत्री आर एम नायडू यांनी संसदेत इंडिगोवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे इतर एअरलाईन्ससाठी एक उदाहरण तयार होईल. एफडीटीएल नियमांशी इतर एअरलाईन्स जुळवून घेत असताना इंडिगोने अंतर्गत संकटामुळे हे केले नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले आहे.
827 कोटी रुपये इंडिगोने प्रवाशांना रद्द तिकिटांसाठी परत केले आहेत. इंडिगोच्या विमान वाहतुकीत सुधारणा होत असली तरी ती संथ गतीने होत असल्याचे दिसते.
1800 उड्डाणे सोमवारी झाली. रविवारी हीच संख्या 1650 होती. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यातही 500 उड्डाणे रद्द झाली.
इंडिगोच्या मते विस्कळीतपणाची कारणे
इंडिगोने अशुभ आणि अनपेक्षित योगायोग म्हणून अनेक घटकांचा एकत्रित परिणाम या विस्कळीतपणास कारणीभूत ठरवला आहे
1) किरकोळ तांत्रिक अडचणी
2) हिवाळ्यातील वेळापत्रकात बदल
3) प्रतिकूल हवामानामुळे वाढलेली गर्दी
4) 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेले नवीन क्रू रोस्टर नियम ( फेज ) लागू करणे.