

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
पर्यावरणाचा हास टाळण्यासह पेट्रोल-डिझेलच्या महागाईवर इलाज म्हणून गेल्या काही वर्षांत ई-वाहनाकंडे कल वाढला खरा; परंतु, या इलेक्ट्रिक वाहनांचे एक ना अनेक शॉक बसू लागल्याने लोकांनी रिव्हर्स गिअर टाकत आपला मोर्चा पुन्हा पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांकडे वळवला आहे.
चार्जिंगची डोकेदुखी हे याचे मुख्य करण मानले जात असले, तरी या शिवायदेखील इतरही अनेक घटक या परतीच्या प्रवासाला कारण ठरत 'मेंकिन्से' या जगप्रसिद्ध संस्थेने भारतासह प्रमुख देशांनी केलेल्या सर्वेक्षणात इलेक्ट्रिक वाहनांकडे पाठ फिरवण्याचा हा मोठा कल दिसून आला.
मुंबई महाराष्ट्रासह देशभरात आज दर दोनपैकी एक ईव्ही मालक परंपरागत बाहनांकडे वळण्याचा विचार करतो आहे. टक्क्यांत सांगायचे, तर भारतात इलेक्ट्रिक वाहन सोडण्याचा विचार १५ टक्के वाहनमालक करत आहेत. भारतातील 'पार्क प्लस' या अन्य एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हेच प्रमाण तब्बल ५१ टक्के असल्याचे दिसते.
'मॅकिन्से'च्या सर्वेक्षणानुसार ४९% ऑस्ट्रेलियन, ४६% यूएस आणि ३८% ब्राझीलमधील इलेक्ट्रिक वाहनधारक-मालक पेट्रोल, डिझेल, सीएनजीकडे पुन्हा वळत आहेत, जागतिक सरासरीच्या तुलनेत २९% ई- वाहनमालक पुन्हा सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल वाहनांना पसंती देत आहेत.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी सुरू केली. राज्य सरकारनेही सबसिडी देऊ केलेली आहे. इतर अनेक राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र अनुदान देण्यास सुरुवात केली.
राज्य सरकारनेही सबसिडी देऊ केलेली आहे. इतर अनेक राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र अनुदान देण्यास सुरुवात केली, तर काहींनी वाहनांची नोंदणी मोफत केली, तरीही इलेक्ट्रिक वाहन नको रे बाबा, म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक ई-वाहनांना पसंती देत होते. परंतु, ई-वाहनांना चार्जिंग करावे लागते. आजही चार्जिंग स्टेशनची संख्या गाड्यांच्या तुलनेत अपुरी आहे. त्यातच लांब पल्ल्याचा प्रवास ई वाहनांनी करणे शक्य नाही यातून हा कल बदलल्याचे दिसते.
इलेक्ट्रिक वाहनांच्या रिसेल व्हॅल्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आतापर्यंत ईव्ही बॅटरीच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी प्रमाणित चाचणीचे मॉडयूल आलेले नाही. आजही ईव्हीच्या किमतीच्या ३० टक्क्यांहून अधिक बॅटरीची किंमत असते.
ई-वाहनांचा खर्च जास्त आहे. सामान्य मेकैनिककडे ई-वाहन घेऊन जाता येत नाही. त्यासाठी शोरूममध्येच जावे लागते. त्यामुळे सार्च अधिक होतो.
वाहनांच्या किमती जास्त असून • बॅटरीही महाग आहे. लाखो रुपयांच्या दुचाकी, चारचाकी खरेदी करून चार्जिंगमध्ये वेळ घालवावा लागतो. याशिवाय बॅटरी जळण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.
८८% ई-वाहनधारकांना वाहन बाहेर काढल्यानंतर चार्जिंग स्टेशनची शोधाशोध करावी लागते. चार्जिंग स्टेशनची संख्या अपुरी असल्याने गाडी तिथपर्यंत जाईल की, नाही याची भीती वाटते. चार्जिंग स्टेशन मिळाले नाही, तर गाड़ी टो करून घरी आणावी लागते. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास अनेकदा टाळला जातो.