India US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत लवकरच ‘चांगली बातमी’? मार्को रुबियो यांचे महत्त्वाचे विधान

मुंबई दौऱ्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे विधान; व्यापार करारातील काही मुद्दे प्रलंबित असल्याचे सांगितले. २६/११ हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली.
India US Trade Deal
India US Trade DealPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. यासंदर्भात अगदी थोडकेच विषय हातावेगळे करणे बाकी असून लवकरच त्यांचा निपटारा होईल.

त्यामुळे लवकरच यासंदर्भात चांगल्या बातमी येईल आणि त्यानंतर करारावर पुर्णत्वास जाईल असा मला विश्वास आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मुक्त व्यापार करारासंदर्भात बोलताना केले.

India US Trade Deal
Sagar Naik Controversy: कोर्टाची बनावट ऑर्डर पाठवून कारवाई रोखली; सागर नाईक यांची नगरविकासकडून चौकशी

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो मंगळवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांची त्यांनी भेट घेतली. अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यावेळी उपस्थित होते.

परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मुंबईत ताज मेमोरियल इथे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रुबियो म्हणाले की, भारत हा जगातला सर्वांत मोठा लोकशाही देश असून अमेरिकेचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश आहे.

India US Trade Deal
Uddhav Thackeray Dussehra Rally: सत्ता बदलासाठी महाराष्ट्र भवानी तलवारीसारखा तळपला पाहिजे! शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे यांची जनतेला हाक

संरक्षण क्षेत्रातही उभय देशांमध्ये व्यापक सहकार्य असून दोन्ही देश क्वाड संघटनेचे महत्त्वाचे सदस्य आहेत. दोन्ही देशात धोरणात्मक, भक्कम भागीदारी असल्याचे रुबियो यांनी नमूद केले.

दरम्यान, भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराच्या सद्यस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर रुबिओ म्हणाले की, माझे परराष्ट्र व्यवहार खाते व्यापार कराराच्या वाटाघाटीत नाही. मात्र, यासंदर्भातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. यासंदर्भात काही बाबी बाकी असून, त्याही लवकरच पूर्ण होतील आणि लवकरच यासंदर्भात चांगली बातमी येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारत ही तेल शुद्धीकरण क्षेत्रातील आघाडीची महाशक्ती आहे. व्हेनेझुएलात तेल उत्पादन कारखाना सुरू करण्याबाबत अमेरिकेचे प्रतिनिधीमंडळ रिलायन्सशी चर्चा करेल, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मंगळवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर दिली.

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आणि बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना रुबिओ यांनी ताज स्मारकावर आदरांजली वाहिली.

रशियन तेलावरील अमेरिकन सवलतींच्या पार्श्वभूमीवर उभय देशांमधील प्रलंबित व्यापार करार पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news