India Bullet Train Network: मुंबई-पुणे, पुणे-हैदराबादसह आणखी सात मार्गांवर बुलेट ट्रेन

या प्रस्तावित कॉरिडॉरच्या माध्यमातून दिल्ली, वाराणसी, पुणे, हैदराबाद, बंगळूर आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांना जोडण्याचे उद्दिष्ट असून, यामुळे देशात बुलेट ट्रेनचे एक व्यापक राष्ट्रीय जाळे तयार होणार आहे.
Bullet Train
Bullet TrainFile Photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असतानाच सरकारने आपल्या दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून आणखी सात नवीन हाय स्पीड रेल मार्ग निश्चित केले आहेत. या प्रस्तावित कॉरिडॉरच्या माध्यमातून दिल्ली, वाराणसी, पुणे, हैदराबाद, बंगळूर आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांना जोडण्याचे उद्दिष्ट असून, यामुळे देशात बुलेट ट्रेनचे एक व्यापक राष्ट्रीय जाळे तयार होणार आहे.

मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळूर, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळूर, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी या नव्या मार्गांच्या माध्यमातून भारतातील काही सर्वात मोठी आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान (आयटी) आणि पर्यटन केंद्रे एकमेकांशी जोडली जाणार आहेत.

Bullet Train
LTT Mega Block: लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ५६ तासांचा विशेष ब्लॉक

या प्रकल्पांच्या बांधकामाचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले, तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कॉरिडॉरचे व्यवहार्यता अभ्यास, मंजुरी, निधीची व्यवस्था आणि भूसंपादन केले जाईल, असे एका अहवालात म्हटले आहे.

Bullet Train
Mumbai Water Crisis: मुंबईवर ३०% पाणीकपातीचे सावट; तलावांमध्ये अवघा ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक

मुंबई-पुणे अंतर ४८ मिनिटांत

मुंबई-अहमदाबाद मार्गाव्यतिरिक्त (१ तास ५७ मिनिटे), सरकारने इतर मार्गांवरील प्रवासाची वेळ देखील जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई आणि पुणे दरम्यान ४८ मिनिटे, बंगळूर आणि चेन्नई दरम्यान ७३ मिनिटे, बंगळूर आणि हैदराबाद दरम्यान २ तास १० मिनिटे, पुणे आणि हैदराबाद दरम्यान २ तास ८ मिनिटे, दिल्ली आणि लखनौ दरम्यान २ तास, दिल्ली आणि वाराणसी दरम्यान ३ तास १५ मिनिटे, तर दिल्ली आणि सिलीगुडी दरम्यान ६ तासांचा प्रवास वेळ लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news