Intensity of rain will increase in maharashtra
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणारPudhari Newsnetwork

येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Rainfall In Maharashtra | आठवड्यांहून अधिक काळ पावसाची उघडीप
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क: मागील दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. दरम्यान येत्या ४ ते ५ दिवसांत पुन्हा एकदा राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के एस. होसाळीकर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

डॉ.होसाळीकर यांनी म्हटले आहे की, पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बहुतांशी जिह्यात १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या दिर्घकालावधीत शून्य टक्के पाऊस झाला आहे. तर येत्या आठवडाभरात पुन्हा एकदा पावसाला सुरूवात होणार असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे संकेत आहेत, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news