Crime News : मध्यरात्री चिमुकल्याला भीक मागायला लावली; खार पोलिसांकडून पालकांवर गुन्हा दाखल

रात्रीच्या अंधारात 8 वर्षांचा मुलगा भीक मागत होता; पोलिसांनी विश्वासात घेत केली सुटका
Crime News
Crime News : मध्यरात्री चिमुकल्याला भीक मागायला लावली; खार पोलिसांकडून पालकांवर गुन्हा दाखलfile photo
Published on
Updated on

In the middle of the night the little one was made to beg; A case has been filed against the parents by the Khar police

मुंबई : पुढारी वृत्तसेवा बॉलिवूड स्टार्सच्या वास्तव्याने प्रसिद्ध असलेल्या खार परिसरात मध्यरात्री भीक मागायला लावलेल्या एका 8 वर्षाच्या चिमुकल्याची खार पोलिसांनी सुटका करण्यात आली आहे.

Crime News
Girl Climbs Tower : ‘मला बॉयफ्रेंडसोबत राहायचंय...’ हट्टी तरूणी मोबाइल टॉवरवर चढली; पोलिसांनी काय केले पहा..

ही घटना 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.40 वाजता घडली. खार पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक एकनाथ जोंधळे आणि त्यांचे पथक पोउपनि पवार, पोउपनि वाघ हे मोबाईल-6 वाहनावरून गस्त घालत होते.

गस्तीदरम्यान खार 3 रोडवरील थेरपी बार अँड रेस्टॉरंटच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर एक लहान मुलगा येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे भीक मागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याला खार मोबाईल-6 वाहनातून थेट पोलीस ठाण्यात आणले.

चौकशीत त्याने आपले नाव विनायक सर्वेश शर्मा, (वय 8 वर्षे) असल्याचे सांगितले. तो मूळचा न्यू पांडे मिश्रा चाळ, डोंगरी पाडा, बीतालपाडा, वसई पूर्व, पालघर येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे नाव सर्वेश रघुनाथ शर्मा (वय 47, धंदा पेंन्टींग काम) असल्याचे त्याने सांगितले.

Crime News
Hartalika Vrat 2026 : हरतालिका व्रताचे काय आहे महत्‍व? माता पार्वतीशी जोडलीय कथा..

इतक्या लहान वयात मध्यरात्री मुंबईच्या रस्त्यावर भीक मागायला लावल्याने पोलिसांनी तात्काळ त्याच्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात पालकांविरुद्ध भिक्षेकरी प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news