

Maratha Reservation
मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैद्राबाद गॅजेट जसंच्या तसं लागू करावं, अशी मागणी जालन्यातील भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनिल आर्दड यांनी केली आहे. ते हैद्राबाद गॅजेट गॅजेटची मूळ प्रत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत.
हैद्राबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाच्या ओळखीशी संबंधित महत्त्वाची माहिती असून ती सरकारने लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मंत्री छगन भुजबळ यांच्या एका दाव्याला खोटं आहे. या हैद्राबाद गॅजेटची मूळ कागदपत्रे सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही मूळ प्रत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या समर्थनार्थ दिली जाणार असून, सरकारने याचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणीही आर्दड यांनी केली आहे.
१९०१ साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत १९०९ साली प्रकाशित झाली.
या प्रती नुसार त्याकाळी मराठवाड्यात ३६ टक्के मराठा कुणबी होते.
मराठा व कुणबी एकच असल्याचा दावा या प्रतीमध्ये उल्लेख आढळतो.
उत्तराखंड राज्यातील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी मध्ये ही प्रत उपलब्ध आहे.
या प्रतीमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद केलेली आहे.