

Mumbai Maratha Morcha
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन झाल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आली आहे.
मनोज जरांगे-पागटील यांचे २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोशळ सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (दि.१) तातडीची सुनावणी झाली. आंदोलन हाताबाहेर गेले आहे. आम्ही संयम ठेवला कारण काही तरी चांगल व्हावं, अशी आमची इच्छा होती, असे स्पष्ट करत पावसात आंदोलन करताय तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा, असेही न्यायालयाने सुनावले. न्यायालयाच्या निर्देशानंतर आज नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजवली आहे. आझाद मैदान पोलिसांन जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान रिकामे करावे, असे पत्रात म्हटले आहे. जरांगे- पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानांची दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ अन्वये सक्षम प्राधिकारी यांची परवानगी प्राप्त केल्याशिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.आंदोलन करावयाचे असल्यास नियमानुसार अर्ज सादर करावा. आंदोलन करण्यास परवानगी दिल्यास सक्षम प्राधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. यापूर्वी आंदोलन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचने दिलेल्या अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केलेले असल्यामुळे आपण सादर केलेल्या विनंती अर्जानुसार मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी याद्वारे नाकारण्यात येत आहे. आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिकामा करावा. दरम्यान, पोलिसांनी जरांगे-पाटील यांना नोटीस बजावल्यानंतर सकाळी आझाद मैदान परिसर रिकामे करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) परिसरातील या परिसरात आंदोलक एकवटले आहेत. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आता स्थानकातील साफ सफाईचेही काम करण्यात आले आहे.