Monsoon Weather Update
ऑगस्टची सुरुवातच राज्यात अतिवृष्टीने होणार आहे. File Photo

IMD Weather Forecast | राज्यात पावसाची बॅटिंग सुरुच; कोकण, गोव्याला अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्रासह 'या' राज्यांना आज 'रेड अलर्ट'
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील काही राज्यांतून मान्सूनच्या परतीला सुरूवात झाली आहे. याचा प्रभाव पश्चिमेकडील राज्यांवरून दिसत आहे. महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह गुजरात, उप हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांना आज २६ सप्टेंबर रोजी रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान, अतिवृष्टीची शक्यतादेखील अनेक ठिकाणी वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार PTI शी बोलताना म्हणाले की, आज महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल तसेच चक्रीवादळाचे परिचलन पश्चिमेकडे सरकले आहे. दरम्यान, आज कोकण गोवा, गुजरात प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट देण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

पुढील २ ते ३ दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये एकाकी मुसळधार पावसासह वाढीव पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत आज आणि उद्या हलका पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज गुरूवार २६ सप्टेंबर रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेशातील तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आणि शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news