Filming Without Permission
मुंबई : कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज येथील विभागात काही दिवसांपासून बेकायदा चित्रीकरणाचे प्रकार वाढले आहेत. बुधवारी (28 मे) रोजी अल्फाईन टॉवर या निवासी इमारतीच्या परिसरात चित्रीकरण सुरू होते. अलीकडे वारंवार हे होत असले तरी पालिका आणि स्थानिक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.
अल्फान टॉवर येथील निवासी इमारतीच्या परिसरात सकाळी 7 वाजेपासून सुरू असलेल्या चित्रीकरणाबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नागरी वस्तीमधील इमारती, रस्ते व हॉटेल्समध्ये कोण परवानगी देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला जावू लागला आहे.
गेल्या 9 दिवसांपूर्वी ठाकूर व्हिलेज येथील गणेश स्विट मार्टमध्ये शूटिंग करण्यात आले होते. यावेळी याचा नाहक नात्र हा पदपथावरून आणि रस्त्यावरून जाणार्या सामान्य नागरिकांना झाला होता.
बुधवारी पुन्हा अशाचप्रकारे बेकायदा शूटिंगमुळे पालिकेचे लाखो रुपयांच्या महसूलांवर पाणी फिरले. तरीसुध्दा झोपी गेलेल्या पालिका आर.दक्षिण विभागातील प्रशासनाला काही नसल्याचे दिसून येत आहे.