IIT Bombay Faculty Data: आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांची धक्कादायक आकडेवारी; एससीचे फक्त ५, एसटीचे एकही प्राध्यापक नाही!

४१२ प्राध्यापकांमध्ये एससीचे ५, ओबीसीचे ६; एसटी प्रवर्गातून एकही प्राध्यापक नाही
IIT Bombay
IIT BombayPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात आल्यानंतरही आयआयटी मुंबईतील एससी, एसटी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील प्राध्यापकांची संख्या अत्यल्प असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

सप्टेंबर २०२६मधील आकडेवारीनुसार, संस्थेतील ४१२ प्राध्यापकांमध्ये एससी प्रवर्गातील केवळ ५, तर ओबीसी प्रवर्गातील ६ प्राध्यापक आहेत. तर एसटी प्रवर्गातून एकही प्राध्यापक कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.

आयआयटी मुंबईमध्ये सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक मिळून ३६३ प्राध्यापक कार्यरत आहेत. यामध्ये एससी प्रवर्गातील २९, एसटी प्रवर्गातील ८ आणि ओबीसी प्रवर्गातील ३५ प्राध्यापकांचा समावेश आहे. संस्थेतील अध्यापनाची एकूण १ हजार २२५ पदे मंजूर असून, त्यापैकी ४५० पदे रिक्त आहेत. ऑल इंडिया ओबीसी स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष गौड किरण कुमार यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मागविली होती.

IIT Bombay
Ganesh Idol Waste Recycling: गणेशमूर्ती विसर्जनानंतर पीओपीच्या संकलनाला वेग; पहिल्याच दिवशी ४१० मेट्रिक टन जमा

यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये मिळालेल्या आरटीआयच्या उत्तरानुसार, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या तिन्ही स्तरांवर एससी प्रवर्गातील ३३ प्राध्यापक कार्यरत होते. एसटी प्रवर्गातील एक सहयोगी प्राध्यापक आणि सात सहायक प्राध्यापक, तर ओबीसी प्रवर्गातील ४१ प्राध्यापक कार्यरत होते. सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या तुलनेत एससी प्राध्यापकांच्या संख्येत केवळ एकाने वाढ झाली आहे.

आयआयटी कानपूरच्या माजी विद्यार्थ्याने या आरटीआयच्या आकडेवारीचा संदर्भ देत आयआयटी मुंबईतील सुमारे ९० टक्के प्राध्यापक सामान्य प्रवर्गातील, सुमारे ५ टक्के ओबीसी आणि सुमारे ५ टक्के एससी-एसटी प्रवर्गातील असल्याचे म्हटले आहे. मात्र, केवळ या आकडेवारीवरून कोणत्याही विशिष्ट प्राध्यापकाने जातीय पक्षपात केल्याचे निष्पन्न होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२०२३मध्ये आयआयटी मुंबईतील प्राध्यापक भरतीसाठी एससी प्रवर्गातील सुमारे ५२३ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी केवळ चार उमेदवारांची निवड झाली. एसटी आणि ओबीसी प्रवर्गातून एकाही उमेदवाराची निवड झाली नाही तर २०२४मध्ये एससी प्रवर्गातील ४४ अर्जदारांपैकी दोन उमेदवारांची, एसटी प्रवर्गातील २२ अर्जदारांपैकी एका उमेदवाराची, तर ओबीसी प्रवर्गातील १०६ अर्जदारांपैकी तीन उमेदवारांची निवड झाली होती, असेही म्हटले आहे.

IIT Bombay
Mumbai Sea Waste Cleanup: कचरा हटवण्यासाठी मानवरहित विद्युत रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी

एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व अत्यल्प असल्यामुळे संस्थांमधील प्रतिनिधित्व आणि भरती प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे स्टुडंट्स असोसिएशनचे कुमार यांनी म्हटले आहे. विविध सामाजिक पार्श्वभूमीतील प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व शैक्षणिक संस्थांमध्ये आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

२०२३ मध्ये आयआयटी मुंबईतील प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येनंतर आयआयटींमधील एससी, एसटी आणि ओबीसी प्राध्यापकांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने एससी आणि एसटी प्रवर्गातील प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी सर्व आयआयटींना विशेष भरती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, आंबेडकर, पेरियार, फुले स्टडी सर्कलने सप्टेंबर २०२४मध्ये दाखल केलेल्या आरटीआयमधूनही या प्रवर्गांतील उमेदवारांच्या निवडीचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news