High Cholesterol Treatment : यकृतात चरबी न साठवता कोलेस्टेरॉल नियंत्रणाचा मार्ग!

आयआयटी मुंबईच्या संशोधनातून सापडली नवी महत्त्वाची उपचारदिशा
High Cholesterol Treatment
High Cholesterol TreatmentAI Image
Published on
Updated on

मुंबई: उच्च कोलेस्टेरॉल, वाढलेले ट्रायग्लिसराइड्स आणि फॅटी लिव्हर यांसारख्या चयापचयाशी संबंधित विकारांवर उपचार करण्यासाठी नवी दिशा दाखवणारे महत्त्वाचे संशोधन आयआयटी मुंबई आणि सहयोगी संस्थांतील संशोधकांनी केले आहे.

आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागातील प्रा. रूप मलिक यांच्या नेतृत्वाखालील पथक गेल्या दशकभरापासून पेशींमधील स्निग्ध पदार्थांच्या वहन प्रक्रियेचा अभ्यास करत आहे. त्यांच्या पूर्वीच्या संशोधनात 'काइनेसिन-१' हे मोटर प्रथिन लिपिड ड्रॉपलेट्सना पेशीच्या कडेकडेने नेऊन व्हीएलडीएल निर्मितीला चालना देते, असे आढळले होते.

High Cholesterol Treatment
Death Registration Data | गरज आमूलाग्र सुधारणांची समाजभान

याच अभ्यासाला पुढे नेत संशोधकांनी 'केटीडीपी' नावाचे एक लघु पेप्टाइड शोधून काढले. हे पेप्टाइड काइनेसिन-१ आणि लिपिड ड्रॉपलेट्स यांच्यातील जोडणी रोखते. त्यामुळे लिपिड ड्रॉपलेट्सची हालचाल मर्यादित होते आणि व्हीएलडीएलचे स्रवण कमी होते. विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे यकृतात चरबी साचत नसल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.

संशोधकांनी उंदरांच्या यकृत पेशींमध्ये तसेच मानवासारखी लिपोप्रोटीन प्रणाली असलेल्या झेब्राफिशवर प्रयोग केले. झेब्राफिशची पिल्ले जवळपास पारदर्शक असल्याने शरीरातील स्निग्ध पदार्थांची हालचाल सूक्ष्मदर्शकाखाली थेट पाहता आली.

हे संशोधन अद्याप पूर्व-नैदानिक टप्प्यात असले तरी भविष्यात उच्च ट्रायग्लिसराइड्स आणि फॅटी लिव्हरसारख्या विकारांवरील अधिक सुरक्षित उपचार विकसित करण्यासाठी ते महत्त्वाचे ठरू शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. सध्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध असली, तरी ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी मर्यादित पर्याय आहेत. या दिशेने हे संशोधन आशादायी ठरू शकते, असे प्रा. मलिक यांनी नमूद केले.

High Cholesterol Treatment
Thane Flood Risk: ठाण्याच्या माथी महापुराचे संकट; विकासाच्या नावाखाली नैसर्गिक नाले गिळंकृत

यकृतातून रक्तात जाणाऱ्या हानिकारक स्निग्ध पदार्थांचा पुरवठा कमी करताना यकृतात अतिरिक्त चरबी साठत नाही, अशी सुरक्षित पेशीस्तरावरील यंत्रणा संशोधकांनी शोधून काढली आहे.

रक्तात सोडल्या जाण्याच्या प्रक्रियेलाच लक्ष्य

आयआयटी मुंबई, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयआयएसईआर) पुणे आणि आयआयएसईआर कोलकाता यांच्या संयुक्त संशोधनातून हा शोध लागला. सध्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपचारपद्धती मुख्यतः एन्झाइम्स, रिसेप्टर्स किंवा जनुकांवर लक्ष केंद्रित करतात. मात्र या संशोधनात यकृतातील 'व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स' (व्हीएलडीएल) तयार होऊन रक्तात सोडल्या जाण्याच्या प्रक्रियेलाच लक्ष्य करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news