माणुसकी संपली ! डोंबिवलीमध्ये मांजराला पाचव्या मजल्यावरून फेकले

अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल
The cat was thrown from the fifth floor
डोंबिवलीमध्ये मांजराला पाचव्या मजल्यावरून फेकण्याची घटना समोर आली आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम डोंबिवलीतील सुंदरा पॅलेस सोसायटीमध्ये एक विचित्र घटना शुक्रवारी (दि.5) समोर आली आहे. महिलेने अडीच महिन्याच्या मांजरावर अमानुषपणे आपला राग काढला आहे. या मांजराला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सदर महिलेच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये सदर महिलेच्या अमानुष कृत्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

डोंबिवलीतील फॅक्स फाऊंडेशन संस्थेच्या पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा रेडकर यांनी या मांजराच्या मृत्यूप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरा पॅलेस सोसायटीच्या आवारात एक अडीच महिन्याचे मांजर वावरत होते. सोसायटी परिसरातील लहान मुले या मांजराशी खेळत असत. मात्र, मांजराचा सोसायटीतील वावर सहन न झाल्याने सुंदरा पॅलेसमध्ये राहणाऱ्या एका अज्ञात महिलेने शुक्रवारी (दि.5) रात्री साडेआठ वाजण्याच्या त्याला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून इमारतीच्या तळ मजल्यावर फेकले.

The cat was thrown from the fifth floor
Crime News : संयम घटतोय, द्वेष वाढतोय! तरुणांमधील मानसिकतेचे विदारक चित्र

तळ मजल्यावर पडल्यानंतर मांजर जागीच मरण पावले. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ही माहिती तात्काळ फॅक्स फाऊंडेशनच्या रेखा रेडकर यांना दिली. रेडकर यांनी पोलिसांना ई-मेलद्वारे माहिती दिली. यानंतर विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दखल घेऊन पोलिसांच्या पथकाला तात्काळ घटनास्थळी पाठविले. या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर हा प्रकार करणाऱ्या एका अज्ञात महिलेच्या विरोधात प्राण्यांचा छळ व बळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक के. पी. कुमटकर आणि त्यांचे सहकारी अज्ञात महिलेचा शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news