Hepatitis C cases Increase: तीन वर्षांत महाराष्ट्रातील हिपॅटायटिस सीच्या रुग्णसंख्येत ८०% वाढ

तीन वर्षांत रुग्णसंख्या ४७९ वरून ८६४ वर; देशातील वाढीच्या तुलनेत महाराष्ट्राचा आलेख अधिक
Hepatitis C cases Increase
Hepatitis C cases IncreasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: देशभरात हिपॅटायटिस सीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना महाराष्ट्रातही रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे समोर आले आहे. २०२२-२३ ते २०२५-२६ या तीन वर्षांत राज्यातील रुग्णसंख्येत तब्बल ८०.३८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशातील एकूण रुग्णवाढीचे प्रमाण ५२.७१ टक्के असताना महाराष्ट्रातील वाढ त्यापेक्षा सुमारे २८ टक्के अधिक आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर आहे.

Hepatitis C cases Increase
Maharashtra Cooperative Sugar Factories: सहकारी साखर कारखाने निम्‍म्याने घटले; संख्या शंभरच्या आत

महाराष्ट्रात २०२२-२३ मध्ये हिपॅटायटिस सीचे ४७९ रुग्ण नोंदविण्यात आले होते. २०२३-२४ मध्ये ही संख्या ६९५, २०२४-२५ मध्ये ७९०, तर २०२५-२६ मध्ये ८६४ वर पोहोचली. म्हणजेच तीन वर्षांत राज्यात ३८५ रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या २०२२-२३ मधील ७२ हजार ८३७ वरून २०२५-२६ मध्ये १ लाख ११ हजार २२९ वर गेली आहे.

राज्याच्या क्रमवारीतही चढ-उतार दिसून येत आहेत. २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र १६ व्या क्रमांकावर होता. २०२४-२५ मध्ये राज्याची घसरण १८ व्या क्रमांकावर झाली, तर २०२५-२६ मध्ये एका स्थानाची सुधारणा होऊन महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर आला.

Hepatitis C cases Increase
Panvel Badlapur Tunnel: पनवेल-बदलापूर प्रवास आता अवघ्या २० मिनिटांत; बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

राज्यनिहाय आकडेवारीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. २०२५-२६ मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक ४३ हजार ८६२ रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये १८ हजार ८७९ आणि हरियाणामध्ये १० हजार ६११ रुग्ण आढळले.

या तीन राज्यांमध्ये मिळून ७३ हजार ३५२ रुग्ण असून, देशातील एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास ६६ टक्के रुग्ण याच राज्यांतील आहेत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत सलग वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर तपासणी आणि उपचारांची उपलब्धता याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

लक्षणे

सतत थकवा आणि अशक्तपणा

भूक मंदावणे, मळमळ व उलट्या

पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे

डोळे व त्वचा पिवळी पडणे

लघवीचा रंग गडद होणे

सांधेदुखी आणि वजन कमी होणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.