Panvel Badlapur Tunnel: पनवेल-बदलापूर प्रवास आता अवघ्या २० मिनिटांत; बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

चार किलोमीटरच्या दोन बोगद्यांपैकी एक पूर्ण; दुसऱ्याचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मार्ग खुला होण्याची शक्यता.
Panvel Badlapur Tunnel
Panvel Badlapur TunnelPudhari
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वरील महत्वाचा टप्पा असलेल्या पनवेल-बदलापूर दरम्यानच्या ४ किमी लांबीचा बोगदा तयार झाला असून दुसऱ्या बोगद्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मुळे बदलापूर ते पनवेल प्रवास अवघ्या २० मिनिटांत गाठता येणार आहे.

तसेच मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी लागणारा २२ ते २४ तासांचा प्रवासाचा वेळ १२ ते १४ तासांवर येणार आहे. ​

येत्या दोन महिन्यात युद्धपातळीवर काम पूर्ण झाल्यानंतर हा बोगदा डिसेंबरअखेर किंवा नवीन वर्षांत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेतील पनवेल-बदलापूर दरम्यानच्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून, माथेरान डोंगररांगांमध्ये ४ किलोमीटर लांबीचा बोगदा (टनेल) तयार करण्यात आला आहे.

Panvel Badlapur Tunnel
Santacruz BMC land: महापालिकेच्या भूखंडावरील बनावट ‘झोपु’चा प्रयत्न अयशस्वी

यातील एक बोगदा वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार झाला असून दुसऱ्या बोगद्याचे काम काम सुरू असल्याने पुढील दोन महिन्यांत दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले होण्याची दाट शक्यता आहे.

​प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. या एक्सप्रेसवेमुळे मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी लागणारा २२ ते २४ तासांचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर म्हणजेच १२ ते १४ तासांवर येणार आहे. त्यामुळे ​वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून बंदरांना फायदा होणार आहे.

Panvel Badlapur Tunnel
Mumbai Water Storage: मुंबईतील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद!

या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा जेएनपीए बंदरात येणाऱ्या-जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीला होणार आहे. यापूर्वी हे कंटेनर नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडी मार्गे जात आहेत. आता ही वाहतूक या नवीन बोगद्यावरून वळवली जाणार असल्याने पनवेल, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि भिवंडी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. तसेच, देशभरात मालाची आयात-निर्यात जलदगतीने पोहोचण्यास मदत होणार आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका

सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या दिल्ली-मुंबई महामार्गातील 'पॅकेज १७' चा हा बोगदा एक महत्त्वाचा भाग आहे. चार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा हा बोगदा रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर यांना थेट जोडतो, ज्यामुळे भविष्यात जेएनपीटीकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक या मार्गावरून सुरळीतपणे पार पडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.