World Liver Day: फॅटी लिव्हर रुग्णांसाठी हिपॅटायटीस ए धोकादायक

लसीकरण व वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा इशारा
World Liver Day
World Liver DayPudhari
Published on
Updated on

मुंबई: हिपॅटायटीस ए हा सहसा सौम्य समजला जाणारा विषाणूजन्यसंसर्ग असला तरी, फॅटी लिव्हर किंवा सिरोसिससारख्या यकृताच्याआजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मात्र तो गंभीर ठरू शकतो. अशा रुग्णांमध्ये हा संसर्ग यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे वेळीच निदान, लसीकरण आणि स्वच्छतेच्या योग्य सवयी अंगीकारणे गरजेचेआहे

हिपॅटायटीस ए हा दूषित अन्न, पाणी किंवा अस्वच्छतेमुळे पसरणारा संसर्ग असून ताप, थकवा, मळमळ, पोटदुखी आणि कावीळ ही त्याचीप्रमुख लक्षणे आहेत. तज्ज्ञांच्या मते, हिपॅटायटीस ए हे प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेवाटे, दूषित अन्न किंवा पाण्यावाटे पसरते. त्यामुळे विशेष स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. गाळून व उकळून पाणी प्यावे, उघड्यावरच्या अन्नपदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे आहे.

World Liver Day
Bandra East Slum Issue: वांद्रे रेल्वे हद्द झाली झोपडपट्टीमुक्त !

यकृताशी संबंधित आजारांवर लवकर निदान व उपचार मिळावेत या उद्देशाने केईएम रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या फॅटी लिव्हर क्लिनिकला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 20 जानेवारी 2025 रोजी या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले होते. क्लिनिक सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 573 रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरचे निदान करण्यात आले आहे. यासाठी अत्याधुनिक फायब्रोस्कॅन 630 (इकोसेन्स) या तपासणी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

World Liver Day
MHADA Redevelopment: बांधकाम विकास तत्त्वावर 4 प्रकल्प; गोराई, चारकोप, जुनी एमएचबी, रामकृष्णनगरसाठी म्हाडा देणार प्रस्ताव

प्रौढांमध्ये, विशेषतःयकृताच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये हिपॅटायटीस ए विषयी जनजागृतीचा अभाव दिसून येतो. साधा वाटणारा संसर्गही यकृतावर गंभीर परिणाम करु शकतो. त्यामुळे थकवा, कावीळ, भूक न लागणे यांसारखी लक्षणे दिसताच त्वरिततज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

- डॉ. रोहन चौधरी, एचपीबी शस्त्रक्रिया आणि यकृतप्रत्यारोपण

हिपॅटायटीस ए ची तीव्रता ही यकृताच्या भूतकाळातील आरोग्यावर अवलंबून असते. निरोगी यकृत असलेल्या व्यक्तींना सौम्य लक्षणे जाणवतात आणि ते सहज बरे होतात. मात्र, ज्या रुग्णांचे यकृत आधीच कमकुवत आहे, त्यांच्यावर या संसर्गाचा गंभीर परिणाम होतो. अशा वेळी ‌‘अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअर‌’ सारखी समस्या निर्माण होऊ शकते.

- डॉ. अनुराग श्रीमल, संचालक यकृत प्रत्यारोपण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news