

Heavy rains expected in Mumbai today and tomorrow
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पावसाचा यलो अलर्ट दिला असून, त्यानुसार मुंबईसह उपनगरांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मुसळधार अंदाज आहे. मंगळवारीही यलो अलर्ट होता. मात्र, तुरळक सरी पडल्या. दोन दिवस हवामानात बदल होण्याचा अंदाज असल्याने गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो.
मुंबईमध्ये २५ ते २८ जून असे सलग ४ दिवस समुद्राला मोठी भरती येणार असून साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळतील. बुधवार ते शनिवारी अनुक्रमे दुपारी १२:०५, १२:५५, १:४० आणि २:२६ वाजता समुद्राची भरती येईल. भरतीवेळीच मोठ्या पावसाची शक्यता असल्याने समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
२५ जून दुपारी १२:०५ ४.७१ मीटर
२६ जून दुपारी १२:५५ ४.७५ मीटर
२७ जून दुपारी १:४० ४.७३ मीटर
२८ जून दुपारी २:२६ ४.६४ मीटर