Maharashtra Weather | आणखी २ दिवस पावसाचेच ; कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

आज, उद्या कोकण, घाट क्षेत्रात 'रेड अलर्ट'
Maharashtra Weather
आज, उद्या पावसाचेच ; कोकणात अतिवृष्टीचा इशाराFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील बहुतांश भागात पावसाचे धुमशान सुरूच आहे. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान पुढील आणखी २ दिवस पावसाचेच असणार आहेत, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या बुलेटीनमध्ये दिली आहे.

आज, उद्या कोकण, घाट क्षेत्रात अतिवृष्टी

राज्यातील घाट क्षेत्र आणि मध्य महराष्ट्रातील काही भागात पुढील २ दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा आणि गुजरात राज्यात आज (दि.२६ जुलै) पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर पाऊसाचे प्रमाण कमी येईल. तसेच पुढील २ दिवसांत मध्य भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्रासह 'या' राज्यातही मुसळधार

आज २६ जुलै आणि उद्या २७ जुलै रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील विदर्भ (दि.२७ जुलै), कोकण आणि गोवा (२७,२८ जुलै), मध्य महाराष्ट्र (२८ जुलै), सौराष्ट्र आणि कच्छ (२६, २८ आणि २९ जुलै) तर संपूर्ण गुजरातमध्ये २७ जुलै ते २९ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news