Rain Update : मुंबईला पुढच्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊसाची शक्यता
Heavy rain likely in Mumbai city and suburbs in next 24 hours
मुंबई शहरासोबत उपनगरामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यताPudhari File photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे.पावसाच्या या पार्श्वभुमीवर कुलाबा वेधशाळेने मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये कुलाबा येथे 83.8 मिमी पाऊस झाला तर सांताक्रुझ येथे 267.9 मिमी इतका मुसळधार पाऊस झाला आहे. यासोबतच सोमवारी (दि.8) सायंकाळी साडेपाचपर्यंत कुलाबामध्ये 101.8 तर सांताक्रुझमध्ये 14.1 मिलीमीटर पावसाने हजेरी लावली आहे.

महानगर पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर शहरातील विविध भागांचा पाऊस नोंदविण्यात आलेला आहे. सोमवारी सांयकाळी 6 पर्यंत या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई शहरात 47.93, पूर्व उपनगरांमध्ये 18.82 तर पश्चिम उपनगरामध्ये 31.74 मिलीमीटर पावसाची आज दिवसभरात नोंद झाली आहे. या बरोबरच दि. (8 आणि 9) दिवशी समुद्रामध्ये दुपारच्यावेळी भरती होणार आहे. यासोबतच लाटांची उंची 3.78 मी ते 4.40 मीटर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Heavy rain likely in Mumbai city and suburbs in next 24 hours
Raigad rains | महाडमध्ये मुसळधार कायम! किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस

याबरोबरच पावसामध्ये झाडे उन्मळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातून आणि उपनगरातून एकूण 40 तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीवरुन सदर तक्रारी पडताळणीकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आल्या आहेत. यावरुन धोकादायक फांदया आणि झाडे तोडण्याचे काम सुरु आहे. .

Summary

प्राप्त झालेल्या तक्रारी :

मुंबई शहर - 06

पूर्व उपनगरात -14

पश्चिम उपनगरात - 20

Heavy rain likely in Mumbai city and suburbs in next 24 hours
IMD : मुंबई, ठाणे, रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

शहरात 12 ठिकाणी शॉर्ट सर्किट तर शॉर्ट सर्किटमध्ये एका महिलेचा मृत्यू

शहरात झालेल्या पावसामुळे 12 ठिकाणी शॉर्ट सर्किट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये मुंबई शहरात 06, पूर्व उपनगरात 01 आणि पश्चिम उपनगरात 05 घटनांच्या तक्रारी अग्नीशमन दलाला प्राप्त झाल्या आहेत. सदर घटना संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य घटनास्थळी रवाना झाले असुन, काम पुर्ण करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सांताक्रुझ (पूर्व) येथील दत्त मंदिर रोड, वाकोला पाईप लाईन येथील हाजी सिध्दिकी चाळीमधील एका खोलीत शॉर्टसर्कीटमूळे आग लागली होती. सदर आग त्वरीत विझविण्यात आली. आगीमध्ये जखमी झालेल्या एका महिलेस उपचारार्थ सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्ही एन देसाई रुग्णालयाच्या कर्तव्यावरील सहा. वैदयकिय आधिकारी डॉ. तौफीक अन्सारी यांनी सदर महिलेस मृत घोषीत केले आहे. मृत महिलेचे नाव- शांता कृष्णा आचार्य (वय.72) असे आहे.

Heavy rain likely in Mumbai city and suburbs in next 24 hours
Heavy rain : पुढच्या काही तासांत मुंबई, ठाणे, पुण्यासह घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस (Video)

मुंबईत झालेल्या पावसामुळे शहर परिसरात 10 ठिकाणी घरे, भिंती पडण्याच्य़ा घटना घडल्या आहेत. यामध्ये शहरात 02, पूर्व उपनगरात 06 आणि पश्चिम उपनगरात 2 अशा एकूण 10 ठिकाणी घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. सदर तक्रारी संबंधित विभागांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news