Raigad rains | महाडमध्ये मुसळधार कायम! किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस

सावित्री नदीला जोडणाऱ्या काळ नदीला पूर
Raigad rains
काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.Pudhari photo

महाड : मागील १८ तासांत महाड शहरासह ग्रामीण भागात, विशेष करून रायगड वाळण बिरवाडी विभागामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काल सायंकाळी उशिरा किल्ले रायगड परिसरातही ढगफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो शिवभक्तांना जीव मुठीत धरून किल्ले रायगडावरून पायरी मार्गाने खाली उतरावे लागले. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. (Raigad rains)

सोमवारी पहाटे सुद्धा पावसाचा जोर कायम होता. महाड आपत्ती निवारण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, महाडमध्ये ८३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सावित्री नदीची महिकावती मंदिर येथे सकाळी सहा वाजता तीन पूर्णांक ८० मीटर पाण्याची पातळी असल्याची माहिती नगरपरिषदेमार्फत देण्यात आली आहे.

Raigad rains
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलल्या

यलो अलर्ट जारी

आगामी ४ दिवसात वेधशाळेने व स्थानिक प्रशासनाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महाडमध्ये एनडीआरएफचे ३० जवानांचे पथक १५ जूनपासून कार्यरत आहे. आणीबाणीच्या प्रसंगी ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनामार्फत नेमण्यात आलेल्या अपदामित्र यंत्रणेमधून नागरिकांना आवश्यक ती मदतकार्य करण्याबाबतचा सूचना स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

Raigad rains
Mumbai rains | मुंबईत मुसळधार! रेल्वे वाहतूक विस्क‍ळीत, एनडीआरएफची पथके तैनात

दरम्यान, रायगडवाडीमधील बेपत्ता ४० वर्षीय व्यक्तीच्या शोधमोहिमेसाठी एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news