Assembly Election | महाविकास आघाडीचे 125 जागांवर मतैक्य

बाळासाहेब थोरात यांची माहिती : गणेशोत्सवानंतर जागावाटप पूर्ण
Maharashtra Assembly Election
विधानसभा निवडणूकfile photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १८० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी व्यक्त केला. महाविकास आघाडीत १२५ जागांवर मतैक्य झाले आहे.

राहिलेले जागावाटपही लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. महाविकास आघाडीत एमआयएमला सामील करून घेण्याचा प्रस्ताव आल्याची मला माहिती नाही.

मात्र, जे काही ते उच्च पातशीवर होतील थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आमच्या आतापर्यंत दोन-तीन बैठका झाल्या आहेत. या बैठकीमध्ये १२५ जागांवर सहमती झाली आहे.

इतर जागांवर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगीतले उद्धव ठाकरेंच्या भूमिकेची पाठराखण विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार असल्याची वृत्तावर ते म्हणाले की, ते धर्मात भेद करत नाहीत. देशविरोधी वागणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधात आम्ही आहोत, हे उद्धव ठाकरे कायम सांगतात. यामुळे त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले पाहिजे.

महायुतीत मैत्रीपूर्ण नव्हे, खऱ्या लढती

विधानसभा निवडणुकीत महायुतीत काही मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे, तर खऱ्याखुऱ्या लढती सध्या सुरू आहेत. त्यांच्यात सगळ्यांना पुढे जायचे आहे. कोणी मागे जायला तयार नाही, असे सांगत थोरात यांनी महायुतीतील सत्तासंघर्षावर टीका केली.

Maharashtra Assembly Election
एमपीएससीच्या परीक्षा पडणार लांबणीवर
Maharashtra Assembly Election
Positive Thinking Day : आनंदी आणि निरोगी जगण्‍याचा 'मंत्र' सांगणारा दिवस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news