Positive Thinking Day : आनंदी आणि निरोगी जगण्‍याचा 'मंत्र' सांगणारा दिवस

जाणून घ्‍या सकारात्‍मक विचारांसाठींच्‍या सोप्या पाच सवयी
Positive Thinking Day
सकारात्‍मक विचाराचे स्‍मरण करण्‍यासाठी १३ सप्‍टेंबर हा दिवस सकारात्‍मक विचार दिन म्‍हणून साजरा केला जातो.File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :

सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा!, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची 'सांगा कसं जगायचं' ही कविता आपल्‍याला थाेडक्‍यात जगण्‍यातील सकारात्‍मक विचाराचे महत्त्‍वच सांगते. 'जरा आशावादी व्‍हा, सकारात्‍मक विचार करा; सारं काही ठीक होईल,' असा सल्‍ला तुम्‍हाला आव्‍हानात्‍मक प्रसंगांचा मुकाबला करताना कुटुंबातील सदस्‍य, मित्र किंवा हितचिंतकांकडूनही मिळत असतोच. मागील काही वर्षांमध्‍ये धावपळीच्‍या जगण्‍यात आशावादी विचार हा जगणं सुकर करण्‍यात मोलाची भूमिका बजावतो, याचे भान आपण हरवून नये, यासाठी १३ सप्‍टेंबर हा दिवस सकारात्‍मक विचार दिन (Positive Thinking Day) म्‍हणून साजरा केला जातो. जाणून घेवूया सकारात्‍मक विचारासाठी नेमक्‍या काेणत्‍या सोप्या सवयी अंगीकाराव्‍यात याविषयी...

Positive Thinking Day
File Photo

सकारात्मक विचार दिन का साजरी केला जाताे?

सकारात्मक विचार दिन 2003 पासून साजरा केला जातो. सकारात्मक विचारांना समर्पित दिन साजरा करण्‍याची कल्पना अमेरिकेतील एका उद्योजकाने मांडली. तेव्‍हापासून १३ सप्‍टेंबर हा सकारात्‍मक विचार दिन म्‍हणून साजरा केला जावू लागला. धुनिक जगातील तणाव आणि चिंता यावर मात करण्‍याची शक्‍ती आशावादी विचारांमध्‍ये आहेत. अनेक संशाेधनांमध्‍ये असे आढळून आले आहे की, सकारात्‍मक विचारसणी व्‍यक्‍तीच्‍या निरोगी जीवनासाठी एक आवश्‍यक बाब आहे. त्‍याचबरोबर अशा विचारांमुळे व्यक्तीचे आयुर्मान वाढते, नैराश्‍य कमी होते. यामुळेच १३सप्‍टेंबर हा दिवस या सकारात्‍मक विचारांचे आपल्‍या जीवनातील महत्त्‍व आणि त्‍याला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी साजरा केला जातो. (Positive Thinking Day)

भीती मनात नकारात्मकता निर्माण करते

भीती ही एक मूलभूत भावना आहे. ही भावना मनात नकारात्मक विचारांचे बीज पेरते. सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची भीती जाणवत असते. त्‍याचे प्रमाण आणि स्‍वरुप यावर आपलं मन विचार करत असते. त्‍यामुळेच सर्वप्रथम आपल्‍या मनाला नेमकी कशाची भीती वाटत आहे, याचा विचारणे आवश्‍यक आहे. भीती कुठून येते?, याचा विचार करा. यानंतर नंतर सर्व तणाव दूर होत असल्याचे कल्पना करा. हे प्रत्येकालाच लागू होईल असे नाही म्‍हणून भीतीवर मात करण्‍यासाठी तुम्‍ही विविध पर्यायांचा अवलंब करु शकता.

Positive Thinking Day
भीती मनात नकारात्मकता निर्माण करतेFile Photo

सकारात्‍मक विचार कसा करायचा?

तुम्हाला एखाद्या गोष्टीवर नकारात्मक प्रतिक्रिया येत असेल तर तुमचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करा. आपण एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत आहात हे ओळखा. आपल्‍या विचारात सकारात्मक गोष्टींबद्दल विचार करण्यासाठी काही क्षण घ्या. तुम्ही त्यांना लिहूनही ठेवू शकता. दिवसभरात अनेक लहान गोष्‍टंचाही सकारात्मक विचार होऊ शकतो. वर्तणूक कशी बदलू शकता याचा विचार करणे सुरु झालं की, तुम्ही दिवसेंदिवस अधिक सकारात्मक व्‍यक्‍ती होवू शकाल.

Positive Thinking Day
सकारात्‍मक विचार कसा करायचा?File Photo

सकारात्‍मक जोपासण्यासाठी 'या' सोप्या सवयी अंगीकारा

दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा

प्रत्येक सकाळची सुरुवात तुम्ही कृतज्ञतेने करा. कुटुंब, मित्रपरिवार, आरोग्‍य, आर्थिक स्‍थिती आदींपैकी तुमच्‍याकडे ज्‍या सकारात्‍मक गोष्‍टी आहेत त्‍याबाबत कृतज्ञता व्‍यक्‍त करा. दिवसभर सकारात्‍मक राहण्‍यासाठी कृतज्ञतेची भावना ही सर्वात उपयुक्‍त ठरते, असे नवीन संशोधनही सांगते. तुम्‍हाला जे प्राप्‍त झाले आहे याबाबत नेहमी कृतज्ञत राहण्‍याचा सकारात्‍मक परिणाम तुमच्‍या आरोग्‍यावरही होतो.

Positive Thinking Day
दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने कराFile Photo

दररोज ध्‍यान करा

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही मिनिटांसाठी ध्यानाचा समावेश करा. घरातील शांत जागा शोधा. डोळे बंद करुन श्वासावर लक्ष केंद्रित करा. ध्‍यान तुम्‍हाला सजग करते. यातून तुमचे विचारही स्थिर राहण्यास मदत होते. तणाव कमी होताे. नियमित ध्‍यान केल्‍याने जीवनातील आव्हानात्मक परिस्थितीतही तुमचा सकारात्मक दृष्टीकोन राखणे सोपे जाते.

Positive Thinking Day
दररोज ध्‍यान कराFile Photo

नकारात्‍मकतेपासून स्वतःला दूर ठेवा

तुम्‍ही कोणत्‍या वातावरणात राहता, यावर तुमची मानसिकता ठरते. प्रेरणादायी पुस्‍तकांचा वाचन करणे. सकारात्‍मक उपक्रमांमध्‍ये जाणीवपूर्वक सहभागी होणे. एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत आहात हे ओळखा. नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवत दिवसभरात अनेक लहान गोष्‍टंचाही सकारात्मक विचार होऊ शकतो याचा विचार करा.

Positive Thinking Day
नकारात्‍मकतेपासून स्वतःला दूर ठेवाFile Photo

विचारांची दिशा बदला

नकारात्मक विचार किंवा परिस्थितीचा सामना करताना तुमचे विचारांमध्‍ये बदल करणे आवश्‍यक आहे. परिस्थितीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. मी अपयशी आहे, असा विचार करण्याऐवजी, या अनुभवातून मी काहीतरी मौल्यवान शिकलो" असा सकारात्‍मक विचार करण्‍याचा मनाला संदेश द्‍या.

Positive Thinking Day
File Photo

रात्रीच्‍या झोपेपूर्वी दिवसभरातील सकारात्‍मक विचारांचा विचार करा

रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात तुम्‍ही कोणते क्षणांमध्‍ये सकारात्मकता अनुभवली याचा विचार करा. आज दिवसभरात काय चांगले झाले याबाबतचे तुमचे अनुभव लिहा किंवा या प्रसंगांची मनात उजळणी करा. या सरावातून तुमच्‍या मनातील समाधानाची भावना वाढेल आणि तुम्‍ही दुसर्‍या दिवसाची सुरुवातही सकारात्‍मक विचारांनीच कराल.

Positive Thinking Day
रात्रीच्‍या झोपेपूर्वी दिवसभरातील सकारात्‍मक विचारांचा विचार कराFile Photo

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news