![हसन मुश्रीफ यांच्या मुलांना 4 मेपर्यंत अंतरिम दिलासा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F09%2F%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AB-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 4 मेपर्यंत ईडीच्या कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले.
पुढील सुनावणीपर्यंत ईडीने मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांवर अटक व अन्य कारवाई करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मुश्रीफ यांचे कथित सी.ए. महेश गुरवच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णयाची सुनावणीही 4 मेपर्यंत पुढे ढकलली.