Haffkine Vaccine: हाफकिनच्या लसींचे स्वामित्व हक्क अंशत: विकणार; जागतिक निविदा जारी झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त

या प्रक्रियेच्या अटी शर्ती राज्य सरकारच्या वेबसाईटवर जारी करण्यात आल्या आहेत.
Haffkine Vaccine
Haffkine VaccinePudhari
Published on
Updated on

मुंबई: ज्या हाफकिन संस्थेने आतापर्यंत अनेक लसी शोधून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला. त्याच हाफकिनने विकसित केलेल्या घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या लसींचे मूळ जीवाणूंचे स्वामित्व हक्क भागीदारी स्वरूपात देण्यासाठी निविदा जारी केल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.

या निविदा जागतिक स्तरावरून मागवण्यात आल्याने जगातील मोठमोठ्या कंपन्या या प्रक्रियेत भाग घेतील, अशी शक्यता आहे. या प्रक्रियेच्या अटी शर्ती राज्य सरकारच्या वेबसाईटवर जारी करण्यात आल्या आहेत.

Haffkine Vaccine
Political News: महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी: एकनाथ शिंदे

जी निविदा सूचना जाहीर झाल्यानंतर त्यावर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुळात हे जीवाणू विक ण्याची गरजच काय? हाफकिनने स्वत: उत्पादन केल्यास ही लस जनतेला कमी दरात मिळेलच. शिवाय हाफकिनलाही त्याचा फायदा होईल. आता एका लसीचे जीवाणू विकायला काढले. यापुढे असेच प्रकार घडले तर हाफकिनकडून होणारी लस निर्मिती थांबेल, अशी प्रतिक्रियाही एका नागरिकाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राला नक्की झालंय काय?

आपण सगळे झिरवाळांच्या कथित लीक व्हिडीओचे चवीने गॉसिप करत बसलोय आणि इकडे सरकार राज्याची 1500 कोटी रुपयांची आरोग्य संपत्ती गुपचूप एका खासगी कंपनीच्या घशात घालत आहे. डॉ. हाफकिन यांनी स्वतःवर प्रयोग करून प्लेगची लस शोधली, पण मानवतेसाठी त्यावर पेटंट घेतले नाही. आज हाफकिन इन्स्टिट्यूटमधील (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा सीड स्ट्रेन विकायला काढलाय.

Haffkine Vaccine
Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून ठाकरे गटात मतभेद

कुणासाठी चाललाय हा घाट? रिलायन्स लाईफ सायन्सेसने हा स्ट्रेन व्यावसायिक अटींवर मागितला आणि कसलाही विचार न करता हाफकिनने लगेच एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट काढले! हाफकिनमधील अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची लालसा राज्याच्या सार्वजनिक आरोग्यापेक्षा मोठी झाली आहे का? मुळात हा स्ट्रेन विकण्याची गरजच काय? हाफकिनने स्वतः उत्पादन केल्यास, लस स्वस्त दरात मिळेल. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था बळकट होईल.

पण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडीच खासगी मालकाला दिली, तर भविष्यात याच लसीसाठी सामान्यांचे खिसे कापले जातील हे नक्की!जागे व्हा! राजकीय गॉसिप्स आणि व्हायरल व्हिडीओ बघण्यातून वेळ मिळाला असेल, तर आता सरकारला जाब विचारा.आता सामान्य नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन मजबूत दबाव गट तयार केले पाहिजेत, तरच ही सार्वजनिक आरोग्याची लूट थांबेल

- भाग्येश मुरूमकर (फेसबुकवरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news